विद्युत् चलित्र च्या कार्या मागील तत्त्वे सांगा.?
Answers
विद्युत् चलित्र : विद्युत् ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे साधन. संवाहकातून विद्युत् प्रवाह पाठविल्यास त्याच्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते आणि त्याचा उपयोग चलित्रातील ऊर्जेच्या रूपांतरासाठी केला जातो. चलित्राला विजेचा पुरवठा केल्यावर त्याचा दांडा फिरू लागतो. चलित्राची ही परिभ्रमी गती यंत्राला देऊन ते चालू करतात व या यंत्राकडून उपयुक्त कार्य केले जाते. याकरिता चलित्र यंत्राला वा यंत्रसामग्रीला चालक दंडाने सरळ जोडतात अथवा दंतचक्र किंवा पट्टा यांच्या साहाय्याने जोडतात. चलित्राने चालविण्यात येणाऱ्या यंत्राला किंवा यंत्रसामग्रीला ‘चलित्राचा भार’ म्हणतात.
विद्युत् चलित्रे वापरायला सोपी, सोयीस्कर व सुरक्षित असून त्यांचा भांडवली व देखाभलीचा खर्च कमी असतो. इतर साध्या यंत्रांपेक्षा चलित्राचा आवाज कमी होतो तसेच त्याच्यापासून धूर वा दुर्गंधी यांचा त्रास होत नाही. शिवाय चालू करणे, गतिमान करणे, विशिष्ट गतीने चालविणे, वेग कमी जास्त करणे, बंद करणे ही सर्व अपेक्षित कामे कार्यक्षम रीतीने, पूर्वनियोजित पद्धतीने आणि गरज भासल्यास स्वयंचलित रीतीने चलित्राकडून करून घेता येतात. यांमुळे यंत्रे व यंत्रसामग्री चालविण्यासाठी इतर साधनांपेक्षा विद्युत् चलित्रांचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो.
आकारमान व क्षमता याबाबतींत चलित्रे अगदी लहानापासून ते प्रचंड असतात. त्यांची अश्वशक्ती एक हजारांशापासून २.३ लाखांपेक्षाही जास्त एवढी असू शकते. स्वयंपाकघरातील उपकरणांना थोडी अश्वशक्ती पुरते म्हणून त्यांच्यातील चलित्रे छोटी असतात, तर थोड्या कालावधीत मोठे कार्य करायचे असल्याने रेल्वेतील चलित्रे मोठी व अधिक गुंतागुतीची असतात.
Answer:
मानवी जीवनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा व निसर्गात सर्वत्र आढळणारा ऊर्जेचा एक प्रकार. अवकाश, वातावरण,जीवसृष्टी, द्रव्य, अणूंना एकत्रित ठेवणारे रासायनिक बंध व खुद्द अणू या सर्व ठिकाणी वीज आढळते. वीज चमकणे किंवा पडणे म्हणजे निसर्गातील विद्युत् विसर्जनाचा प्रचंड लोळ होय. याउलट प्राण्यातील एक तंत्रिका कोशिका (मज्जापेशी) लगतच्या दुसऱ्या तंत्रिका कोशिकेकडे पाठवीत असणारा अतिशय दुर्बल विद्युतीय आविष्कार आहे. तसेच अंबर या द्रव्यावर (शिळाभूत रूपातील