Biology, asked by bobadeabhishek2, 19 days ago

विद्यूत गीझरचा उपयोग

Answers

Answered by sparshkhandelwal7
0

Answer:

आजच्या दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणासाठी आपल्याला विजेची गरज भासते. वाढत्या नागरिकीकरणामुळे व त्याचबरोबर सतत वाढणारी लोकसंख्या यामुळे विजेचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला. पण सध्या अस्तित्वातील वीजनिर्मितीची क्षमता अपुरी पडत आहे. यासाठी सूर्यापासून येणाऱ्या ऊर्जेचा उपयोग करून घेणे हाच यावर एकमेव उपाय आहे. म्हणूनच अपारंपरिक ऊर्जेचा होणारा वापर हा भावी काळासाठी गरजेचा व बचतीचा महामंत्र होऊ बसला आहे.

खालील प्रकारच्या उर्जा आपल्याला सूर्यापासून मिळवता येतात:

१) उष्ण उर्जा (Solar Thermal)

२) प्रकाशीय उर्जा (फोटोव्होल्टाइक/Photovoltaic)

दैनंदिन घरगुती वापराकरिता सौर ऊर्जेचा वापर शक्यतो तीन कारणांसाठी करता येतो. त्यापैकी एक म्हणजे गरम पाण्यासाठी ‘सोलर हिटर’ अन्न शिजविण्यासाठी “सोलर कुकर” व घरात लागण्यार्या विजेच्या उपकरणांच्या “वीजनिर्मितीसाठी” करता येऊ शकतो. त्यामुळे सामान्य नागरिक आपल्या दैनंदिन वापराकरिता सौर उर्जेचा उपयोग गरम पाणी, अन्न शिजविण्याकरिता व वीज वापर करण्याकरिता करू शकतात आणि नैसर्गिक ऊर्जेचा लाभ घेऊन बचतीचा नवा मार्ग अवलंबू शकतात.

सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे व त्याचा उपयोग

१) सौर उष्ण जल प्रणाली (Solar Water Heating System)

आंघोळीसाठी बहुतेक कुटुंबातून गरम पाण्याचा वापर केला जातो. हे गरम पाणी करण्यासाठी गावी बंब अथवा चुलीवर गरम पाणी करण्याची पद्धत आजही अस्तित्वात आहे. तसंच शहरी भागात इलेक्ट्रिक गिझर, गॅस गिझर अथवा गॅस शेगडीचा वापर केला जात आहे. पण दिवसेंदिवस इंधनटंचाई, वीजटंचाईची समस्या गंभीर होताना आपण पाहत आहोत. तसंच इंधनाचे साठे मर्यादित असल्याचेही संकेत आपल्याला मिळू लागले आहेत. इंधनांवर असलेल्या मर्यादा आणि उपलब्धता यामुळे स्वयंपाकाचा गॅस, केरोसीन, पेट्रोल, डिझेल इत्यादींच्या किमती झपाटय़ाने वाढत आहेत. विजेचं भारनियमन वाढलं आणि चौदा तासांपर्यंत वीज नाहीशी होऊ लागली. त्यामुळे सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी मिळवण्यात अडचणी समोर येऊ लागल्या. या सर्व अडचणी सर्वत्रच सारख्या आहेत. त्यामुळे या समस्येवर उपाय आहे सौरबंब म्हणजेच सोलर वॉटर हीटर. सूर्यापासून येणाऱ्या उष्ण ऊर्जेचा वापर पाणी गरम करण्यासाठी उपयोग केला जातो. या प्रकारात सूर्यापासून येणारी उष्णता हिटिंग पॅनेल/नाळ्यामध्ये घेऊन सहजरीत्या थंड पाणी ८० अंश से. पर्यंत उष्ण करता येऊ शकते. यामध्ये कोणताही इंधनखर्च, वीजखर्च लागत नसून अतिशय कमी देखभाल खर्च लागतो. या सिस्टीमचे आयुष्य साधारणपणे ८ ते १० वर्षे असते. फक्त सुरुवातीला एकदाच गुंतवणुकीची गरज असते.

Similar questions