Science, asked by Ashokpathave, 10 months ago

विद्युत विलेपण म्हणजे काय?​

Answers

Answered by ms8120584
2

मानवी जीवनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा व निसर्गात सर्वत्र आढळणारा ऊर्जेचा एक प्रकार. अवकाश, वातावरण,जीवसृष्टी, द्रव्य, अणूंना एकत्रित ठेवणारे रासायनिक बंध व खुद्द अणू या सर्व ठिकाणी वीज आढळते. वीज चमकणे किंवा पडणे म्हणजे निसर्गातील विद्युत् विसर्जनाचा प्रचंड लोळ होय. याउलट प्राण्यातील एक तंत्रिका कोशिका (मज्जापेशी) लगतच्या दुसऱ्या तंत्रिका कोशिकेकडे पाठवीत असणारा अतिशय दुर्बल विद्युतीय आविष्कार आहे. तसेच अंबर या द्रव्यावर (शिळाभूत रूपातील रेझिनावर) लोकरी कापड घासल्यास अंबर विद्युत् भारित होते; तर विशिष्ट ईल (मासे) इतर प्राण्यांना विजेचा झटका देऊ शकतात.

वीज दिसत नाही, तिला गंध नसतो अथवा तिला आवाजही नसतो. तथापि वीज जे कार्य करते (उदा., प्रकाश वा उष्णता निर्माण करण्याची व तिचा व्यावहारिक वापर करण्याची पुष्कळ तंत्रे विसाव्या शतकात पुढे आली. त्यामुळे तिचे उपयोग वाढत जाऊन वीज हे आधुनिक समाजाचे एक महत्वाचे अंग बनले. जगातील बहुतेक वीजनिर्मिती मोठ्या जनित्रांमार्फत होते व त्याकरिता दगडी कोळसा, खनिज तेल अथवा नैसर्गिक वायू हे इंधन वापरतात. कारखान्यातील चलित्रे व यंत्रसामग्री तसेच घरगुती वापराची यंत्रोपकरणे चालविणे, रस्त्यावरील व घरातील दिवे प्रज्वलित करणे, धातूचा मुलामा देणे, वितळजोडकाम करणे, वाहकपट्टे फिरविणे, भट्ट्यांमधून बाहेर पडणाऱ्या वायूंमधील प्रदूषक कण साक्याच्या रूपात काढून टाकणे वगैरे असंख्य कामांकरिता वीज लागते. शिवाय दूरध्वनी, दूरचित्रवाणी व रेडिओ (प्रेषण व ग्रहण), चित्रपट, रडार, संगणक, रोबॉट, अवकाशयाने, कृत्रिम उपग्रह, विमाने, जहाजे, रेल्वे, मोटारगाड्या इ. ठिकाणी विजेचा वापर होतो. अशा रीतीने वीज ही वापरावयास सुटसुटीत असल्याने तिच्यामुळे समाजात परिवर्तन घडून आले आहे. मात्र ती काळजीपूर्वक वापरली नाही, तर आग लागणे, झटका वसणे व मृत्यूही ओढवणे यांसारखे धोके तिच्यामुळे उद्‌ भवू शकतात.

ऋण विद्युत् भारित इलेक्ट्रॉन व धन विद्युत् भारित प्रोटॉन हे अणूचे दोन मुख्य विद्युत् भारित घटक असून प्रॉटॉन अणुकेंद्रात असतात, तर इलेक्ट्रॉन अणुकेंद्राभोवती फिरत असतात. या दोन कणांवरील विद्युत् भारांमधील प्रेरणांवर सर्व विद्युतीय आविष्कार अवलंबून असतात. या धन व ऋण विद्युत् भारांमधील आकर्षण प्रेरणांमुळे अणुकेंद्र व त्याभोवतीचे इलेक्ट्रॉन धरून ठेवले जाऊन अणू बनतो. काही परिस्थितींत अणूमधील एक वा अनेक इलेक्ट्रॉन मुक्त होतात आणि ते धातू वा अन्य द्रव्यातून अगर शलाकारूपात वाहत गेल्याने विद्युत् प्रवाह निर्माण होतो.

Similar questions