India Languages, asked by palvechaitanya01, 5 days ago

वंद्य वंदे मातरम या कवितेतुन मिळणारा संदेश​

Answers

Answered by ankitap0906
1

Answer:

वंदे मातरम त्यात गीतात एकूण पाच कडवी आहेत, त्यातील पाहिलं कडवं १९५० साली आपण राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलं.

मुळात वंदे मातरम् बंगाली-संस्कृत मिश्रित असल्याने काहींना याचा अर्थ समजून घेणं कठीण जातं. म्हणून आज आम्ही घेऊन आलो आहोत वंदे मातरमचा संपूर्ण अर्थ आपल्या मायमराठीत...

चला तर जाणून घेऊ काय आहे आपल्या राष्ट्रीय गीताचा नेमका अर्थ :

मूळ वंदे मातरम् !

वन्दे मातरम्

सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्

सस्यश्यामलाम् मातरम्।

शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्

फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्

सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्

सुखदाम् वरदाम् मातरम्‌ ॥ १ ॥

वन्दे मातरम्‌ ।

मराठी स्वैर अर्थ :

हे माते मी तुला प्रणाम करतो. पाण्याने परिपूर्ण, फळांनी बहरलेली, दक्षिणेच्या वायू लहरींनी शामल (शांत) भासणारी, बहरलेल्या पिकांनी समृद्ध अश्या माझ्या मातेला मी प्रणाम करतो.

शुभ्र चांदण्यांमुळे बहरलेल्या इथल्या रात्री आल्हाददायक असतात. फुलांच्या राजींनी, वृक्षांनी मढवलेली इथली जमीन शोभून दिसते. पाण्याची अवीट गोडी, मधुर बोली, सुख समृद्धी देणारी हे माता, माझा तुला प्रणाम !

Similar questions