विदयार्थी विद्यार्थिनी या नात्याने या शिबिरात प्रवेश मिळण्याबाबत संबंधित व्यक्तीला विनंती पत्र लिहा.
Answers
Answer:
दिनांक: १९ एप्रिल २०१९
प्रति,
माननीय श्री. विनय गायकवाड संचालक, विनय अॅकॅडमी
२, सोमवार पेठ, कराड.
विषय: 'मराठी सुलेखन वर्गात प्रवेश मिळण्याबाबत. माननीय महोदय,
मी अ.ब.क, इयत्ता दहावीचा विद्यार्थी असून विनय ॲकॅडमीतर्फे आयोजित मराठी सुलेखन वर्गात प्रशिक्षण घेण्यास इच्छुक आहे. मागच्या सुट्टीत मी आपले 'अ, आ, इ, ई' हे पुस्तक वाचून काढले. या पुस्तकात आपण सुलेखन कसे करावे याबद्दल सांगितले आहे, ते वाचून मी प्रेरित झालो.
'सुंदर अक्षर हाच खरा दागिना' असे म्हटले जाते. मलाही माझे अक्षर सुव्यवस्थित, नीटनेटके व वळणदार करण्याची इच्छा आहे, म्हणून १ मे ते ३१ मे या कालावधीत चालणाऱ्या आपल्या सुलेखन प्रशिक्षण वर्गात मला प्रवेश घ्यायचा आहे; पण येथे सहभागी होणाऱ्या मुलांची संख्या खूप असल्यामुळे मला प्रवेश मिळणे जरा कठीण झाले आहे.
एक प्रामाणिक व इच्छुक विद्यार्थी म्हणून आपण या वर्गात मला प्रवेश द्यावा आणि आपल्या 'अक्षर' साधनेत सहभागी करून घ्यावे ही नम्र विनंती.
आपला विश्वासू
अ. ब. क.
३, साधना,
बुधवार पेठ, कराड. [email protected]
Explanation:
hope it's help to you..
Explanation: