वादयपदार्य विकता चौकात गाडीवर
कोन आहे
Answers
Answer:
सातारायेथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्या कॉर्नरवर जिल्हा परिषद ते शासकीय विश्रामगृह जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या एका वडापावच्या गाडयास भरधाव व्हॅगन आर कारने जोराची धडक दिली. या अपघातात गाडयावरील उकळत्या तेलाची कडई अंगावर पडल्याने गाडा चालकासह त्याची पत्नी व मुलगी तिघेही भाजून गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास घडली.याबाबत घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी, जिल्हा परिषद कार्यालयाच्या लगत राजेंद्र बन्सी पोतदार (वय ४२, रा. भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी वसाहत) यांचा वडापावचा गाडा आहे. दररोज वडापावचा गाडा चालवून उदरनिर्वाह करणारे पोतदार नेहमीप्रमाणे शुक्रवारीही वडापाव बनवण्याचे काम करत होते. त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांची पत्नी सौ. निर्मला (वय ३५) व मुलगी (वय ११) हे दोघे कामात मदत करत होते. दुपारी १ च्या सुमारास पोवई नाक्यावरुन जिल्हा परिषदेकडे व्हॅगनआर कार (एम. एच-११ एके ६५१९) भरधाव आली. जिल्हा परिषद कार्यालयाच्या कॉर्नरवरुन ही कार वळण घेऊन शासकीय विश्रामगृहाकडे जाण्यासाठी निघाली असताना कार चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि ही कार पोतदार यांच्या प्रसाद वडापाव सेंटर नावाच्या गाडयावर जावून आदळली. वडापावच्या गाडयाला जोरदार धडक बसल्याने गाडयावरील उकळत्या तेलाची कढई वडापाव बनवण्यात मग्न असणारे राजेंद्र पोतदार, सौ. निर्मला पोतदार व कु. पायल पोतदार यांच्या अंगावर उलटली. यामुळे हे तिघेही भाजून गंभीर जखमी झाले.या विचित्र अपघातामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. काही नागरीकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.