Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा: वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो .

Answers

Answered by chirag1212563
28

वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो . हे विधान योग्य आहे.

वितरणाच्या नकाशात बिंदूद्वारे (dot) प्रदेश किंवा  स्थान नकाशात दर्शवले जाते. स्थानाचे योग्य ठिकाण रेखांकित करण्यासाठी टिंब किंवा बिंदू अचूक ठिकाणी लावणे हे वितरण नकाशात अति आवश्यक असते. टिंब थोडेसेहि इकडे तिकडे झाल्यास रेखांकित स्थानाचा सुगावा लावणे कठीण होते. म्हणून वितरण नकाशात बिंदूचे योग्य रेखांकन अति महत्वाचे असते कारण वितरणाच्या  उद्देश्य स्थान दाखवणे हा असतो.

Answered by gadakhsanket
21

★ उत्तर - वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो.

हे विधान योग्य आहे.

आलेख किंवा आकृत्यांद्वारे दर्शविण्यात येणारी आकडेवारी नकाशाशिवायही दाखविता येते पण या आकडेवारीचे स्थानिक वितरण नकाशाद्वारे व्यक्त केले तर ते खऱ्या अर्थाने भौगोलिक वितरण दर्शविते. वितरणाच्या नकाशांमुळे भौगोलिक घटकांचा त्या स्थानीय वितारणावर कसा परिणाम झाला आहे हे यातून स्पष्ट होते. म्हणून वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो.

धन्यवाद...

Similar questions