वृध्दाश्रमातील वृध्दाचे मनोगत
Answers
Answer:
एका वृद्धाचे मनोगत
मी मा.बो. करांच्या इच्छेनुसार मांडणीत बदल केला आहे.
वयाबरोबर पाठीने घेतला बाक आहे
प्रकृतीत आजारांना लाडाचा थाट आहे
पोटभरतीस औषधांचा आहार मुख्य आहे
चिंतलेल्या मनास धार्मिकतेचा आधार आहे.
जेष्ठ नागरीकत्वाची समाजात ठिगळ आहे
देणगी रुपातली चबुतर्यावर नावाची ओळ आहे
पुतळ्यालाही सढळ हस्ते दिल्यास वाव आहे.
सौभाग्यवती मृत होऊन भाग्यवान आहे
भोगयातना साहण्यास उरले जीवनमान आहे
मनोरंजनी नातवंडं शिल्लक समाधान आहे.
मुला-मुलींचा आपआपला संसार स्वतंत्र आहे.
इस्टेटीच्या वाट्यात मन मात्र एकत्र आहे.
मृत्युपत्र, सजीव होण्याच्या प्रतिक्षेत आहे
तुटपुंज्या पेन्शनमुळे थोडा मान स्थित आहे.
माझा अनुभव, त्यांच्या वर्तमान चालीत वाद आहे
कितीही झाले वाद तरी माघार मात्र माझीच आहे
कारण चार खांद्यांसाठी मला त्यांचाच आधार आहे
ही माझी जुनी मांडणी आहे.
नविन मांडणीसाठी मला काही मा.बो.करांचे सल्ले मिळाले
वयाबरोबर पाठीनेही बाक घेतला आहे
प्रकृतीने आजारांनाही लाडावले आहे
आहारा पेक्षा औषधच पोट भरत आहे
धार्मिक क्षेत्रात मन आता विसावत आहे
जेष्ठ नागरीक म्हणून समाजात ठिगळ आहे
देणगी देऊन चबुतर्यावर नाव कोरल आहे
सढळ हस्ते दिल्यास पुतळ्यालाही वाव आहे
सौभाग्यवती मृत होऊन भाग्यवान ठरली आहे
दु:खाचे भोग मी घडलेल्या पापांबरोबर भोगत आहे
नातवंड खेळवण्यात मनोरंजन उरले आहे
मुला-मुलींनी आपाअपले स्वतंत्र संसार थाटले आहेत
इस्टेटीच्या वाट्यात मात्र सगळ्यांचे मन एकत्र आहे
मृत्युपत्र, सजीव होण्याच्या प्रतिक्षेत आहे
तुटपुंज्या पेन्शनमुळे थोडा मान उरला आहे
माझा अनुभव, त्यांच्या वर्तमान चालीत वाद आहे
कितीही झाले वाद तरी माघार मात्र माझीच आहे
कारण चार खांद्यांसाठी मला त्यांचाच आधार आहे