History, asked by shivamyeotikar510, 5 months ago

विधेयक म्हणजे काय ?​

Answers

Answered by Badboy0102
2

Answer:

Explanation:

विधेयक (Bill) म्हणजे कायद्यात रूपांतरित करण्यासाठी सादर केलेला मसुदा.

हे विधेयक संसदेचे कनिष्ठ सभागृह म्हणजेच लोकसभेत आणि वरिष्ठ सभागृह म्हणजेच राज्यसभेत बहुमताने पारित केल्यावर ते महामहिम राष्ट्रपती महोदयांकडे त्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येते.

राष्ट्रपतींनी त्या विधेयकावर स्वाक्षरी केल्यावर त्या विधेयकाचे रुपांतर कायद्यात होते.

राष्ट्रपती ते विधेयक सुधारणा सुचवून सरकारकडे पुन्हा पाठवू शकतात. पण ते विधेयक पुन्हा राष्ट्रपतींकडे मंजूरीसाठी आल्यावर राष्ट्रपतींना ती विधेयकं मंजूर करणं बंधनकारक असतं.

राष्ट्रपतींकडे काही नकाराधिकार असतात ज्याचा वापर करून ते एखादं विधेयक मंजूर करण्याला तात्पुरती किंवा कायमस्वरूपी स्थगिती देऊ शकतात. पण ह्या नकाराधिकाराचा वापर फार कमी वेळा झालाय.

जेव्हा सरकार एखादं विधेयक मंजूर करण्यात अतीउत्सुक असतं पण राज्यसभेत बहुमताच्या अभावाने विधेयक मंजूर करण्यात अपयशी ठरते तेव्हा सरकार दोन्ही सभागृहांची एकत्रित अधिवेशन (Joint Sitting) बोलावून लोकसभेतल्या बहुमताच्या जोरावर विधेयक मंजूर करून घेतं.

भारतात काही विषय हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात तर काही राज्य सरकारांच्या अखत्यारीत येतात. भारतात विकेंद्रीकरणाची पद्धत आहे.

घटनेत बदल करताना किंवा विकेंद्रीकरणा संदर्भात एखादं विधेयक मंजूर करण्यासाठी संसदे बरोबरच अर्ध्या पेक्षा जास्त राज्यांनी आपापल्या सभागृहांमध्ये त्याला मंजुरी देणं गरजेचं आहे. (वस्तु आणि सेवा कर विधेयक मंजूर करण्यासाठी संसदे बरोबरच १५ पेक्षा जास्त राज्यांनी विधेयकाला मंजुरी दिली होती. कारण वस्तु आणि सेवा कर विधेयकामुळे राज्यांच्या उत्पन्नात बदल होणार होता).

घटनेत बदल किंवा विकेंद्रीकरणाशी संबंधित विधेयकांमध्ये एकत्रित अधिवेशनाची सोय नाही.

संसदेला कायदे करण्याचे अधिकार आहेत. सर्वोच्च न्यायालय त्याची घटनात्मक वैधता तपासू शकते.

Similar questions