World Languages, asked by bitsianrk4660, 9 days ago

विविध अवयव संस्थापध्दतीने काम करतात.​

Answers

Answered by jaiswalmahek94
0

Answer:

शरीरात निरनिराळया कामांसाठी निरनिराळया संस्था आहेत.

रचना व बांधणी - अस्थिसंस्था (हाडे आणि सांधे)

हालचाल - स्नायू

पदार्थाची देवाणघेवाण - पचनसंस्था आणि श्वसनसंस्था

पदार्थाची अंतर्गत वाहतूक - रक्त, रस हे माध्यम आणि रक्ताभिसरण संस्था

टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट- मूत्रसंस्था, (तसेच मोठे आतडे, त्वचा व श्वसनसंस्था)

नियंत्रण -चेतासंस्था, ज्ञानेंद्रिये आणि संप्रेरकसंस्था

संरक्षण - त्वचा हालचाल आणि रोगप्रतिकार व्यवस्था

पुनरुत्पादन -जननसंस्था

अस्थिसंस्थाआपल्या शरीराचे चलनवलन हाडे, सांधे व त्यांना हलवणारे स्नायू यांमुळे होते. बहुतेक सर्व शारीरिक हालचालींत हाडे व स्नायूंचा भाग असतो. मात्र पापणी,जीभ वगैरे काही भागांत मुख्यतः फक्त स्नायूंचेच काम असते

अस्थिसंस्थेच्या रचनेचे मुख्यतः चार भाग पडतात

पाठीचा कणा

डोक्याची कवटी

हात, खांदे, छातीच्या फासळया

पाय, खुबे व कमरेची हाडे

पाठीचा कणा हा मध्यभागी असून बाकीचे गट हे त्याला जोडलेले असतात. हातांची व पायांची स्थूल रचना बरीचशी सारखी असते. फक्त हाताच्या विशिष्ट ठेवणीमुळे अधिक कुशल हालचाल शक्य होते.

शरीराचा आकार व उंची ही अस्थिसंस्थेमुळेच असते. तसेच हालचालही यामुळेच शक्य होते. कवटीमुळे मेंदूचे संरक्षण होते. छातीच्या पिंज-यामुळे फुप्फुसे व हृदयाचे संरक्षण होते. कंबरेच्या हाडांमुळे लघवीची पिशवी, स्त्रियांची जननसंस्था, इत्यादी सुरक्षित राहतात.

हाडांची रचना कठीण पेशींनी बनलेली असते. त्यातला कठीणपणा चुन्याच्या क्षारांमुळे असतो. काही हाडांमध्ये पोकळया असून त्यांत रक्तपेशी तयार होतात. हाडांच्या रचनेवरुन व आकारांवरुन त्यांचे प्रकार पाडलेले आहेत. (उदा. चपटी हाडे, लांब हाडे).

सांधेसांध्यांचे काम दोन प्रकारचे असते. एक म्हणजे निरनिराळी हाडे एकमेकांशी जोडणे आणि धरुन ठेवणे. दुसरे काम म्हणजे विशिष्ट प्रकारची हालचाल होऊ देणे. सांध्यांच्या रचनेप्रमाणे त्यांचे प्रकार असे :

करवती (अचल) सांधा : यात हालचाल होत नाही. हाडे पक्की जोडलेली असतात. उदा. कवटीची हाडे एकमेकाला अशी जोडलेली असतात.

बिजागरीचा सांधा : या सांध्यात दाराप्रमाणे किंवा अडकित्त्याप्रमाणे एकाच दिशेने हालचाल होऊ शकते. उदा. गुडघा, कोपर, इ.

उखळीचा सांधा: खुबा, खांदा यांमध्ये मागेपुढे, बाजूला वगैरे दोन-तीन दिशांनी हालचाल होऊ शकते.

सरकता सांधा : यांमध्ये हाडे फक्त एकमेकांवर थोडी सरकू शकतात. उदा. मनगटातील सांधे, पायाचा घोटा, टाचा, तळवा यांतील सांधे.

याखेरीज सांध्याला मजबुती येण्यासाठी बाजूंनी घट्ट पडद्याचे आवरण (सांधेकोष) असते. एखादा सांधा मुरगळतो तेव्हा या पडद्यांना ताण पडून इजा झालेली असते. या आवरणातून एक प्रकारचा तेलकट पदार्थ निघून हाडांची झीज होणे वाचते. हाडांचे एकमेकांवर घर्षण होऊ नये व हालचालींमुळे बसणारे धक्के कमी व्हावेत यासाठी हाडांवर मऊ कूर्चेचे आवरण असते.

स्नायुसंस्थास्नायू म्हणजे गरजेनुसार आखूड-सैल होऊ शकणा-या असंख्य तंतूंची एक जुडी किंवा गट असतो. स्नायू बहुधा दोन वेगवेगळया हाडांना घट्ट जोडला गेलेला असतो. स्नायू आखडला की मधल्या सांध्यापाशी हालचाल होते. यामुळे हाडे एकमेकांच्या जवळ येतात किंवा लांब जातात. स्नायूंमुळे शरीरात पापणी लवण्याच्या लहान क्रियेपासून ते कु-हाडीने लाकडे फोडण्याच्या ताकदीच्या हालचालीपर्यंत सर्व गोष्टी घडतात. तसेच श्वासोच्छ्वास, हृदयाची धडधड, मल-मूत्रविसर्जन, अन्न गिळणे, घुसळणे, अशा सर्व क्रिया स्नायूंच्याच हालचालींमुळे होतात.

Similar questions