१. विविध पदार्थांमधील भेसळ ओळखण्याचे उपाय सुचवा.
Answers
Answer:
अन्नपदार्थ
भेसळीचा पदार्थ व प्रकार
भेसळ ओळखण्याच्या पद्धती
रवा
लोखंडाचा चुरा
रव्यावरून चुंबक फिरवावे.
मोहरी
धोतर्याचे बी
धोतर्याचे बी एका बाजूला त्रिकोणी असते.
डाळ (हरभरा, तूर)
मेटॅनील यलो सारखे रंग
रंगयुक्त डाळ ओळखायची असेल तर थोडी डाळ पाण्यात टाकून त्यावर हायड्रोक्लोरिक अॅसिड टाका. त्याला जांभळा रंग आल्यास त्यामध्ये मेटॅनील यलो रंगाची भेसळ आहे, हे लक्षात येते.
चहा पावडर
आधी वापरलेली चहा पावडर रंग देऊन मिसळणे, लाकडाचा भुसा, रंगीत पावडर
चहा पावडर थंड पाण्यात घातल्यानंतर रंग सोडते किंवा ओल्या पांढर्या कागदावर टाकल्यास कागदावर गुलाबी व लाल रंगाचे ठिपके दिसतात.
मटार फ्रोजन
रंग
मटार पाण्यात घालावेत. थोड्या वेळानंतर पाणी रंगीत होईल.
मिठाई
मेटॅनील यलो रंग
मिठाईचा तुकडा घेऊन त्यावर हायड्रोक्लोरिक अॅसिड टाका. त्याला जांभळा रंग आल्यास मिठाईत मेटॅनील यलो रंगाची भेसळ असल्याचे समाजावे.
सफरचंद व तत्सम फळे
चकचकीत दिसण्यासाठी मेणाचा थर
पातळ सुरी अशा फळांच्या सालावरून हलकेच फिरवावी. मेण सुरीला चिकटून येईल.
हळद
मेटॅनील यलो रंग
पाच थेंब पाणी आणि पाच थेंब हायड्रोक्लोरिक अॅसिड घातल्यास रंग बदलतो.
लाल तिखट
विटेचा चुरा
चमचाभर लाल तिखट पाण्यात घातले तर पाणी रंगीत होते.
दूध
पाणी मिसळणे, स्निग्धता काढून घेणे, धुन्याचा सोडा
दुधात बोट बुडवल्यानंतर दूध बोटाला चिकटले नाही, तर स्निग्धता नाही.
शहाजिरे
काळा रंग दिलेले गवती बी
हातावर चोळले तर हात काळा होतो.
पिठी साखर
वॉशिंग सोडा
पाण्यात विरघळल्यानंतर लिटमस चाचणी केल्यास लाल लिटमस निळा होतो.
खवा, पनीर
पिष्ठमय पदार्थ
खवा किंवा पनीरमध्ये थोडे पाणी घालून गरम करा. थंड झाल्यावर काही थेंब आयोडिन टाकल्यास भेसळ असलेले पनीर किंवा खवा निळसर रंगाचा होतो.
खाद्यतेल
खनिज तेल
एका परीक्षानळीत अंदाजे पाच मिलीमीटर तेल घेऊन त्यामध्ये अल्कोहोल पोटॅशियम हायड्रोऑक्साइड घालून ते उकळत्या पाण्यात पाच मिनिटे हलवा. खाद्य तेलामध्ये खनिज तेल नसल्यास ते त्यात विरघळते. खनिज तेल असल्यास त्याचे दोन थर तयार होतात.
नारळाचे तेल
इतर तेल मिसळणे
फ्रीजमध्ये ठेवल्यास नारळाचे तेल गोठते इतर तेल नाही.
केशर
रंगवलेल्या मक्याच्या तुर्याचे तुकडे
शुद्ध केशरचे तुकडे सहज होत नाहीत. मात्र, त्यात रंगवलेल्या मक्याच्या तुर्याचे तुकडे असल्यास ते सहज तुटतात. शुद्ध केशर पाण्यात विरघळते. मात्र, तसेच राहाणारे मक्याचे तुकडे लहान धाग्यासारखे दिसतात.
मध
गुळाचे पाणी
कापसाची वात मधात भिजवून पेटवली आणि मधात भेसळ असेल तर वात तडतडते.
धने पावडर
लाकडाचा भुसा
थोडीशी धने पावडर पाण्यावर टाका. जर त्यातील