विविध विषयांमधील क्रुतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते
class -10th( semi english) history lesson 9
correct answer must be given a BRAINLIST MARK
Answers
i hoe it is correct answer
Correct Question:
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा:
इतिहास संशोधन करताना विविध विषयांमधील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
Answer:
इतिहास संशोधन करताना विविध विषयांमधील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
Explanation:
१. इतिहास संशोधन करताना इतिहासाची साधने मिळवणे खूप महत्त्वाचे असते.
२. तसेच ऐतिहासिक घटनांच्या सूची तयार करणे, मिळालेल्या साधनांचे जतन करणे, ती साधने प्रदर्शित करून इतिहासलेखन करणे अशी अनेक महत्त्वपूर्ण कामे इतिहास संशोधन करताना करावी लागतात.
३. या प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या कौशल्यांची व गुणांची आवश्यकता असते.
४. ही प्रत्येक कामे करत असताना करावयाची कृती आणि तसेच पूर्वतयारी वेगवेगळी असते.
५. या सर्व कृती करताना कोणती काळजी घ्यावी, काय करावे व काय करू नये, हे माहीत असणे खूप आवश्यक असते.
६. जर प्रशिक्षण नसेल तर या गोष्टी लक्षात येऊ शकत नाहीत.
म्हणून, इतिहास संशोधन करताना विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.