India Languages, asked by rs3936307, 9 months ago

व्याकरण कृती:
प्रश्न-1) खालील वाक्यातील उपमेय व उपमान ओळखून लिहा.
1)अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.
2) तिचे हास्य जणू खळखळणारा झराच.​

Answers

Answered by varadad25
5

Answer:

1. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा!

उपमेय: देवाचे नाव

उपमान: अमृत

2. तिचे हास्य जणू खळखळणारा झराच.

उपमेय: तिचे हास्य

उपमान: झरा

Explanation:

1. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा!

प्रस्तुत वाक्यात 'देवाच्या नावाचे' वर्णन केले आहे.

देवाच्या नावाची तुलना ही 'अमृतासोबत' केली आहे.

ज्याचे वर्णन केले आहे, ते 'उपमेय' असते.

आणि ज्याच्याशी तुलना केली आहे, ते 'उपमान' असते.

म्हणून,'देवाचे नाव' हे उपमेय असून 'अमृत' हे उपमान आहे.

2. तिचे हास्य जणू खळखळणारा झराच.

प्रस्तुत वाक्यात एका स्त्रीच्या 'हास्याचे' ( तिच्या हास्याचे ) वर्णन केले आहे.

स्त्रीच्या हास्याची तुलना ही 'झऱ्यासोबत' केली आहे.

म्हणून, 'तिचे हास्य' हे उपमेय असून 'झरा' हे उपमान आहे.

─────────────────────

अधिक माहिती:

१. अलंकार:

जसे मानवाला सुंदर दिसण्यासाठी, बाह्य रूपासाठी अलंकारांची, दागिन्यांची गरज असते, तसेच भाषेला सुंदर बनवण्यासाठी भाषेलाही अलंकाराची आवश्यकता असते.

२. अलंकाराचे महत्त्व:

अलंकार हा एक व्याकरणाचा प्रकार असला तरी, कवी आणि लेखक आपले विचार अधिक प्रभावीपणे मांडण्याचे एक प्रभावी साधन म्हणूनच अलंकार वापरतात.

३. अलंकाराचे प्रकार:

अलंकाराचे मुख्य दोन प्रकार आहेत.

१) शब्दालंकार ( शब्दाला महत्त्व )

२) अर्थालंकार ( अर्थाला महत्त्व )

काही अलंकाराचे उपप्रकार:

१. उपमा अलंकार

२. उत्प्रेक्षा अलंकार

३. रूपक अलंकार

४. अनुप्रास अलंकार

४. उपमा अलंकार:

एखाद्या गोष्टीचे वर्णन करताना त्या गोष्टीची तुलना अन्य गोष्टीसोबत केली जाते, तेव्हा उपमा अलंकार होतो.

उदाहरण:

गुरू हा ज्ञानाचा सागर असतो.

५. उत्प्रेक्षा अलंकार:

हा अलंकार उपमा अलंकारासारखाच असून, यात मुख्यत्वे, जणू, जसे, जणू काही, किती तरी, इत्यादी शब्दांचा वापर केला जातो.

उदाहरण:

गुरू म्हणजे जणू ज्ञानाचा सागरच!

६. रूपक अलंकार:

जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे दाखवले जाते, तेव्हा रूपक अलंकार होतो.

उदाहरण:

रामा तुझे डोळे कमळाहूनही सुंदर आहेत.

७. अनुप्रास अलंकार:

जेव्हा शब्दांची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती केली जाते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.

उदाहरण:

मी माझ्या नाला माझ्या नातील माझे विचार सांगून नेहमीच नातच आनंदी होत असतो.

Answered by Yashicaruthvik
4

Answer:

उपमेय=देव...उपमान =अमृत ....अलंकार=रुपक अलंकार  

.....अलंकारांची वैशिष्ट्य =उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे

1. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा!

उपमेय: देवाचे नाव

उपमान: अमृत

2. तिचे हास्य जणू खळखळणारा झराच.

उपमेय: तिचे हास्य

उपमान: झरा

Explanation:

1. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा!

प्रस्तुत वाक्यात 'देवाच्या नावाचे' वर्णन केले आहे. l

देवाच्या नावाची तुलना ही 'अमृतासोबत' केली आहे. l

ज्याचे वर्णन केले आहे, ते 'उपमेय' असते. l

आणि ज्याच्याशी तुलना केली आहे, ते 'उपमान' असते. l

म्हणून,'देवाचे नाव' हे उपमेय असून 'अमृत' हे उपमान आहे. l

2. तिचे हास्य जणू खळखळणारा झराच. l

प्रस्तुत वाक्यात एका स्त्रीच्या 'हास्याचे' ( तिच्या हास्याचे ) वर्णन केले आहे.l

Explanation:

Similar questions