English, asked by athawalemayur115, 6 months ago

व्याकरर् कृती -

१) पुढील उिाहरर्ांमध्ये कोर्ता अलंकार आहे तेओळखा. 2

१) आईचे प्रेम पिणजे जणूसागरच.

२) ततचे डोळे कमळाच्या पाकळयांसारखे सुंदर आिेत​

Answers

Answered by SofiaMaria
1

Answer:

फूल

कमळ हे चिखलात, पाण्यामध्ये आढळते. दिसायला सुंदर असणारी ही जलवनस्पती निलंबियासी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव निलंबो नुसिफेरा असे आहे. तिच्या सुमारे १०० जाती जगभर आढळतात. तिचे मूळस्थान भारत, चीन आणि जपान असावे. इराणपासून पूर्वेस ऑस्ट्रेलियापर्यंत तिचा प्रसार झाला आहे.भारतात जवळपास सर्व प्रदेशात कमळाची फुले सापडतात.कमळ हे भारताचे व विएतनामचे राष्ट्रीय फुल आहे.कमळाची फुले उबदार असतात.कमळ हे विविध रंगात पाहायला मिळते. कमळाचे फळ खाण्यासाठी मखना या नावानी वापरतात . कमळ हे फूल देवी लक्ष्मीच्या हातात आपल्याला दिसते. कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे.

कमळाच्या खोडा-पानाचे वर्णन

साधारणपणे गोडय़ा आणि उथळ पाण्यात वाढणारी ही वनस्पती एक ते दीड मीटर उंच आणि एकाच पातळीत येन मीटरपर्यंत पसरते. खोड लांब असून पाण्याच्या तळाशी जमिनीवर सरपटत वाढते. पाने मोठी वर्तुळाकार, छत्राकृती, ६०-९० से.मी. व्यासाची असतात. पानाचे देठ लांब असतात. पानावरील शिरा पानाच्या मध्यापासून किरणाप्रमाणे पसरलेल्या असतात. कमळाची पाने आणि फुले पाण्याच्या संपर्कात न राहता पाण्यावर येऊन वाढतात. कमळाचे फूल सुगंधी आणि मोठे असते. फुलांचा रंग जातींनुसार वेगवेगळा असतो. आपल्याकडे मुख्यतः गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची कमळे आढळतात.कामालाकडे विविध किटके आकर्षित होत असतात त्यामुळे तेतील जैविविधता टिकून राहते

कमळाची पुष्पथाली (कमळकाकडी) आणि बी (कमलाक्ष) यांचा वापर अनेक भारतीय, विशेषतः सिंधी लोक खाण्यासाठी करतात.

वैदिक महत्त्व

वैदिक वाड्मय कमळाचे गुणगान करताना थकत नाही. भगवान कृष्णानेही गीतेमध्ये कमळाला आदर्श मानून तसे जीवन जगण्याचा उपदेश केला.

अनासक्तीचा आदर्श म्हणजे कमळ. संसारात राहूनही संसाराच्या दोषांपासून मुक्त राहण्याची जीवन दृष्टी कमळ देते. कमळाचे पान (पद्मपत्र) पाण्यात असूनही पाण्याचा एक थेंबही स्वतःला लागू देत नाही. 'जलकमलवत्' संसारात राहाण्याची कला कमळाकडून शिकण्यासारखी आहे.

ज्ञानेश्वरीत तिसर्‍या अध्यायात मुक्त व योगी पुरुषाची लक्षणे सांगताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात

जो अंतरी दृढु । परमात्मरूपीं गूढु । बाह्य तरी रूढु । लौकिक जैसा ॥ ६८ ॥

तो इंद्रियां आज्ञा न करी । विषयांचे भय न धरी । प्राप्त कर्म न अव्हेरी । उचित जें जें ॥ ६९ ॥

तो कर्मेंद्रियें कर्मी । राहाटतां तरी न नियमी । परी तेथिचेनि ऊर्मी । झांकोळेना ॥ ७० ॥

तो कामनामात्रें न घेपे । मोहमळें न लिंपे । जैसे जळीं जळें न शिंपें । पद्मपत्र ॥ ७१ ॥

पाचव्या अध्यायात योगयुक्त पुरुषाची लक्षणे सांगताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात:

आतां अधिष्ठानसंगती| अशेषाही इंद्रियवृत्ती| आपुलालिया अर्थीं| वर्तत आहाती || ४८||

दीपाचेनि प्रकाशें| गृहींचे व्यापार जैसे| देहीं कर्मजात तैसे| योगयुक्ता || ४९||

तो कर्में करी सकळें| परी कर्मबंधा नाकळे| जैसें न सिंपे जळीं जळें| पद्मपत्र || ५०||

मानव परिस्थितीचा गुलाम आहे ही निराशाजनक विचारधारा भारतीय संस्कृतीला मान्य नाही. योगायोगाने वाईट वातावरणात/ परिस्थितीत जन्म झाला असला तरी पण मानव स्वतःचे ध्येय उच्च आणि दृष्टी उन्नत ठेवील तर तो मांगल्याकडे जाऊ शकतो अशी भारतीय संस्कृतीची धारणा आहे. चिखलात राहूनही ऊर्ध्व दृष्टी राखून सूर्योपासना करणारे कमळ ही गोष्ट किती सरळपणे समजावते आहे! कमळाला चिखलात निर्माण करून प्रभूने आपल्याला परिस्थिती निरपेक्ष जीवन जगण्याच्या प्रेरणेचे आगळे दर्शन घडविले आहे. तसेच कमळ हे सौंदर्याचेही प्रतीक आहे. कवींनी मानवाच्या प्रत्येक अंगाला कमळाची उपमा दिलेली आहे. भगवंताच्या अवयवांनाही कमळाची उपमा देऊन ऋषीमुनींनी त्याचे पूजन केले आहे.

Similar questions