व्याख्या लिहा.
2) विघटन
Answers
Answer:
सामाजिक विघटन आणि संघटन( सोशल डिस्ऑर्गनाइझेशन अॅण्ड ऑर्गनाइझेशन). सामाजिक संघटन समाजातील सरलता टिकवून ठेवीत असले,तरी नेहमी तसेच चालू राहते असे नाही. प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीहून भिन्न असते. तिच्या आवडी-निवडी भिन्न असतात; सार्वजनिक नियमांचे पालन करण्याची वृत्ती भिन्न असते. यामुळे मतभेद होऊन संघर्ष उद्भवतो आणि फाटाफूट वाढत जाते. माणसे परस्परविरोधी वर्तन करतात. त्यामुळे हितसंबंध बिघडतात. हेवेदावे, भांडणे,कटकारस्थाने सुरू होतात. संघटन मोडते, ऐक्याला धोका होतो आणि समाजात अशांतता निर्माण होते. मतभेद ताणले जाऊन समूहांमध्ये भेदनीय परिस्थिती निर्माण होते, त्याला सामाजिक विघटन म्हणतात.
सामाजिक विघटनामुळे समाजाचे नुकसान होते. संघर्षात हिंसा, आक्र मण, क्रू रता अशा समाज विघातक कृती व वर्तनांचा अवलंब केला जातो. कुटुंब, नातेवाईक, शेजारी, गाव या साऱ्या समूहांचे अतोनात नुकसान होते.
विघटनाची सुरु वात स्पर्धेने होते. स्पर्धा ही साधनसामगी कमी आणि मागणी जास्त यांमुळे होते. स्पर्धा आणि चढाओढ विकासाला पोषक असू शकतात; मात्र त्यांत खेळमेळीचे व निकोप विचारांचे संयमित धोरण असावे लागते. गैरमार्गांचा अवलंब झाला आणि स्पर्धात्मक वर्तनांच्या मर्यादा ओलांडून स्वार्थ बोकाळला, तर विघटन होते. अपयशी, निराश, वैफल्यगस्त समूह एकत्रित होऊन एखादे दुष्कृत्य घडवून आणतात. त्यामुळे सामाजिक विघटन गंभीर स्वरूप धारण करते. सामाजिक विघटनाचे सर्वांत उग स्वरूप दहशतवादी व आतंकवादी कारवायांद्वारे चालू असलेल्या घटनांमध्ये दृग्गोचर होते. शिवाय विविध देशांमधील युद्घसंबंध, शस्त्रास्त्रस्पर्धा, सीमावाद आदींमधून सामाजिक विघटनाची प्रक्रिया घडते