History, asked by shaileshpatil2524, 1 month ago

व्याख्या लिहा.
हस्तांदोलन​

Answers

Answered by adevkar100
1

Explanation:

काही दिवसांपूर्वी माझी एका मित्राशी अनेक वर्षांनी, अचानक भेट झाली. 'सध्या काय चाल्लंय’छाप बोलणी झाल्यावर निरोप घेताना त्याने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. 'हस्तांदोलन का करायचं?' हा प्रश्न मला नेहमीच पडतो. पण त्यादिवशी या प्रश्नाच्या बरोबरीने मला आणखी काही प्रश्न पडले.

दोन मुलगे भेटल्यावर त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन करण्याची शक्यता बरीच मोठी असते. पण एक मुलगा आणि एक मुलगी भेटल्यावर त्या दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन करण्याची शक्यता तेवढीच असते की त्याहून कमी? आणि अशा वेळी कोणी हात पुढे करण्याची शक्यता जास्त असते: मुलाने की मुलीने? असा विचार करता करता मग दोन मुलींनी एकमेकींशी हस्तांदोलन केल्याचा प्रसंग मी आठवून पाहू लागले. असा एकही प्रसंग आठवला नाही. मुलाशी बोलताना मुलीने हस्तांदोलनासाठी हात पुढे केल्याचेही कधी पाहण्यात आलेले नाही.

मी हा प्रश्न नंतर माझ्या ओळखीतल्या एक-दोघांना विचारला. तेव्हा आपणहून मुलाशी हस्तांदोलन करण्यास हात पुढे करणार्‍या मुलींची ३-४ उदाहरणे सापडली. पण मुलींनी तसे करण्याची शक्यता एकूण कमी असते असेही निरीक्षण ऐकायला मिळाले. यावर अधिक चर्चा केली असता, हस्तांदोलन करणार्‍या/न करणार्‍या दोघांची ओळख कोण करून देत आहे (म्हणजे ओळख करून देणार्‍या व्यक्तीचे वय, लिंग आणि नाते काय), ते दोघे किती पाश्चिमात्य आणि/किंवा कॉर्पोरेट वातावरणात वावरणारे आहेत, त्यांची सापेक्ष वये काय आहेत, भेट कोणत्या परिस्थितीत/वातावरणात झाली आहे या गोष्टींचा हस्तांदोलन करण्या/न करण्यावर परिणाम होऊ शकतो असे लक्षात आले.

त्याचप्रमाणे, मुलींना हस्तांदोलन करायची इच्छाच नसते की इच्छा असूनही ते सामाजिक संकेतांत बसत नसल्याने त्या तसं करत नाहीत हाही एक प्रश्न येथे उभा राहतो आहे.

याखेरीज, मुली किमान स्पर्श करत कसनुसे हस्तांदोलन करतात असेही एक निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

या बाबतीत 'ऐसी...'करांना आलेले अनुभव जाणून घ्यायला आवडेल. त्याचप्रमाणे, यासंबंधात काही मते/विचार/निरीक्षणे असल्यास तीही जाणून घ्यायला आवडतील. का: तर रिकामपणचे उद्योग आणि कुतुहल, आणखी काय?

Similar questions