व्यापाराच्या उपयुक्ततेच्या अटी कोणी सादर केली tybcom
Answers
Answer:
आंतरराष्ट्रीय व्यापारामागील सिद्धांत: आंतरराष्ट्रीय व्यापार कोणत्या तत्त्वांवर आधारित आहे, हे पाहणे उद्बोधक होईल. ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जॉन स्ट्यूअर्ट मिल इ. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय व्यापारामागील तत्त्व विशद करण्याचा आपापल्या परीने प्रयत्न केला. अर्वाचीन काळात सनातनवादी सिद्धांताचा पुरस्कार टाउसिग व हॅबरलर या अर्थशास्त्रज्ञांनी केला आहे. विसाव्या शतकात स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ बर्टिल ओहलिन याने सनातनवादी सिद्धांत बाजूला सारून आंतरराष्ट्रीय व्यापारतत्त्वाला दिलेले पद्धतशीर रूप सर्वमान्य झाले आहे.
ॲडम स्मिथने आपल्या वेल्थ ऑफ नेशन्स (१७७६) ह्या जगप्रसिद्ध ग्रंथात आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत श्रम-विभागणीच्या तत्त्वावर विशद केला आहे. देशादेशांत होणारी मालाची देवघेव प्रत्येक देशाची राष्ट्रीय संपत्ती वाढविण्यास कारणीभूत ठरते, असे स्मिथचे म्हणणे. तो म्हणतो, “जी गोष्ट स्वत: तयार केली तर महाग पडेल, ती गोष्ट दुसरीकडून स्वस्त मिळत असेल तर विकत घ्यावी, हे कुठल्याही धोरणी कुटुंबप्रमुखाला माहीत असते .
व्यापाराच्या उपयुक्ततेच्या अटी कोणी सादर केल्या