India Languages, asked by sanika6930, 4 months ago

वायुप्रदूषण निबंध मराठी मध्ये​

Answers

Answered by Anonymous
4

वायू प्रदूषण (इंग्रजी Air pollution) उद्भवते जेव्हा वायू, कण आणि जैविक रेणूंचा समावेश असलेल्या पदार्थांची हानीकारक किंवा अत्यधिक प्रमाणात पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश केला जातो. यामुळे मानवांमध्ये रोग, अलर्जी आणि मृत्यू देखील होऊ शकतात; हे इतर सजीवांना जसे की प्राणी आणि अन्न पिके यांस हानी पोहोचवू शकते आणि नैसर्गिक किंवा मानव निर्मित पर्यावरण वातावरणास हानी पोहोचवू शकते. मानवी क्रिया आणि नैसर्गिक प्रक्रिया दोन्ही वायू प्रदूषण निर्माण करू शकतात.केवळ बाहेरील वायू प्रदूषणामुळे ते ४.२१ दशलक्ष अकाली लोकांचा मृत्यू होतात

२०१४ जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २०१२ मधील वायू प्रदूषणामुळे जगभरात सुमारे ७ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला होता, अंदाजे आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने प्रतिध्वनी व्यक्त केली.

वायुप्रदूषण म्हणजे वातावरणाचे मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणाचाअविभाज्य भाग असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींना हानिकारक असलेले घटक जेव्हा हवेमध्ये मिसळून जातात तेव्हा वायुप्रदूषण झाल्याचे समजण्यात येते. फक्त मानवी आरोग्यास हानिकारक असलेले वातावरणातील घटक वायुप्रदूषणास जबाबदार आहेत, असे पूर्वी समजले जात असे. कालांतराने वायुप्रदूषणाची व्याख्या इतर प्राण्यांना, पक्ष्यांना व वनस्पतींना हानिकारक असलेल्या घटकांनाही लागू झाली. सध्याच्या युगात हवामान बदलास जबाबदार असणारे घटक हे देखील वायुप्रदूषणाला कारणीभूत असल्याचे मानले जाते.

1: प्रदूषक घटके

नैसर्गिक हवेतील जे पदार्थ अथवा घटक मानवी, प्राणी, पक्षी, वनस्पती, उपयुक्त जंतू यांच्या आरोग्यास व जीवनास हानिकारक आहेत, तसेच जे हवामान बदलास कारणीभूत आहेत त्यांना प्रदूषक घटक असे म्हणतात.

भारतातील एअर् इंडियाची चळवळ

सल्फर डायॉक्साईड (SO2)जेव्हा कोळसा किंवा रॉकेल जळते तेव्हा त्यांमध्ये असणार्‍या गंधकाचे-सल्फरचेही ऑक्सिडेशन होते व सल्फर डायॉक्साईड तयार होतो. सल्फर डायॉक्साईड पाण्यात लवकर विरून जातो. जर हवेत सल्फर डायॉक्साईडचे प्रमाण जास्त झाले व त्या काळात पाऊस पडला तर त्याचे पाण्यामध्ये मिसळून सल्फ्यूरिक अम्ल तयार होते व यालाच अम्लधर्मी पाऊस म्हणतात. अम्लधर्मी पावसाने पिकांवरती मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. जमीन अम्लयुक्त होते व हळूहळू नापीक बनते. असल्या पावसाने त्यातल्या गंधकाची इमारतींच्या मटेरिअलवर रासायनिक क्रिया होऊन इमारतींचे आयुष्य कमी होते. सल्फर डायाक्साईड जेव्हा श्वसनावाटे नाकपुड्यांमध्ये जातो तेव्हा श्वसननलिकेतील पेशी सल्फर डायॉक्साईडला फुफ्फुसापासून पोहोचण्यापूर्वी कफातील पाण्यात विरून टाकतात. जर याचे प्रमाण जास्त झाले तर नलिकेत अजून जास्ती कफ होतो व सर्दी होते.

Similar questions