वायू प्रदूषण प्रश्न आणि उत्तर
Answers
Explanation:
प्रश्न कोणत्या उद्योगासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा मान्यता / परवानगी आवश्यक असते?
ज्या उद्योगातून, पर्यावरणामध्ये मलप्रवाह किंवा औद्योगिक सांडपाणी सोडण्याचा संभव असेल किंवा वातावरणामध्ये कोणतेही वायु प्रदूषण करण्याचा संभव असेल अशा कोणत्याही उद्योगास, त्याच्या कार्यचालनास किंवा त्याच्या प्रक्रियेस किंवा त्याचा विस्तार व वाढ करण्यास (प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंध) अधिनियम 1974 च्या व वायु (प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंध) अधिनियम 1981 च्या तरतुदींन्वये राज्य नियंत्रण मंडळाची मान्यता घेतली पाहिजे
तसेच 2000 मध्ये सुधारण केल्याप्रमाणे घातक घनकचऱ्यांची , निर्मिती, साठवण, वाहतूक, विल्हेवाट किंवा हाताळणी करणा-या कोणत्याही उद्योगाने देखील फक्त नियमान्वये महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची मान्यता घेणे आवश्यक आहे.
जैव वैद्यकीय टाकाउ पदार्थ (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे जैव-वैद्यकीय टाकाउ पदार्थ निर्माण करणा-या वैद्यकीय संस्थांनी देखील या नियमान्वये प्राधिकारपत्र मिळविणे आवश्यक आहे.