Hindi, asked by sunitar8457, 1 year ago

व्यायाम आरोग्यदायी मित्र । हे ध्यानी ठेवावे सूत्र ।
आळस वैरी मानिला सर्वत्र । सर्वतोपरी ।।
व्यायामाविण सात्त्विक भोजन । तेहि मारी विकारी होऊन ।
व्यायामे होय अग्निदीपन । अन्नपचन सहजचि ।।
व्यायामे जडत्व जाई दूरी । व्यायामे अंगी राहे तरतरी ।
रक्तव्यवस्था उत्तम शरीरी । वाढे विचारी सजीवपण ।।
व्यायामाने सशक्त स्नायु । व्यायामे मानव होय दीर्घायु ।
व्यायामहीना पित्त, कफ, वायु । जर्जर करिती अत्यंत ।।
व्यायामे वाढे प्रतिकार शक्ति । स्वावलंबनाची प्रवृत्ति ।
व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति । कार्य करण्याची ।।

हया कवितेचा सरळ अरथ​

Answers

Answered by studay07
15

Answer:

आरोग्यदायी मित्र । हे ध्यानी ठेवावे सूत्र ।

आळस वैरी मानिला सर्वत्र । सर्वतोपरी ।।

आरोग्यच हे आपल्या खऱ्या मित्र प्रमाणे आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे .  आणि आळस हा सर्वात मोठा क्षत्रू आहे . आलस करू नये .

व्यायामाविण सात्त्विक भोजन । तेहि मारी विकारी होऊन ।

व्यायामे होय अग्निदीपन । अन्नपचन सहजचि ।।

नियमित व्यायाम करणे म्हणजे सात्विक भोजन करणे होय जे शरीराला योग्य असते आणि आपल्याला रोग आणि विकारांपासून दूर ठेवते.  व्यायाम केल्याने अन्नपचनाची प्रक्रिया सहज होते .

व्यायामे जडत्व जाई दूरी । व्यायामे अंगी राहे तरतरी ।

रक्तव्यवस्था उत्तम शरीरी । वाढे विचारी सजीवपण ।।

व्यायाम करणे थोडे अवघड जरी असले तरी व्यायामामुळे आपल्या शरीरात तर तरी राहते आणि रक्तपुरवठा देखील व्यवस्थित होतो . आपल्या शरीरात ज्या वेळी तर तरी असते त्या वेळी आपल्या मनात हि साकारआत्मक विचार येतात .

व्यायामाने सशक्त स्नायु । व्यायामे मानव होय दीर्घायु ।

व्यायामहीना पित्त, कफ, वायु । जर्जर करिती अत्यंत ।।

व्यायामकेल्यानी आपले स्नायू मजबूत बनतात आणि आणि ज्या वेळी आपले स्नायू मजबूत असतात त्या वेळी सर्व शरीर प्रक्रिया व्यवस्थित चालतात आणि आपल्या आयुष्य वाढवण्यास मदत करतात . पित्त ,  खोकला आणि शवसनाचे त्रास यांचा अंत होतो .

व्यायामे वाढे प्रतिकार शक्ति । स्वावलंबनाची प्रवृत्ति ।

व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति । कार्य करण्याची ।।

व्यायामाने रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर स्वालंबी होत सोबतच कोणतेही काम करण्यासाठी स्फूर्ती येते . शरीरात ताकत राहते ,. थकवा येत   नाही  

Similar questions