व्यायामाने शरीरावर होणारे परिणाम
Answers
Answered by
2
व्यायामाने शरीर तंदुरूस्त राहते. मन ताजेतवाने राहते. त्यामुळे व्यायाम हा आपला नित्याचा कार्यक्रम असला पाहिजे असे आपण अनेकवेळा शाळातील पुस्तकात वाचतो आणि इतरही अनेक कार्यक्रमातून आपल्याला ऐकायला, वाचायला मिळत असते. एवढे असूनसुध्दा नित्य किंवा अधूनमधून व्यायाम करणार्यांची संख्या समाजात कमीच आहे. पहाटे उठून आपण फिरायला जातो तेव्हा फिरायला आलेले बरेच लोक आपल्याला दिसतात. परंतु त्यांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात विचारात घेतली तर अत्यल्पच असते. त्यामुळे समाजाला वारंवार व्यायामाचे फायदे समजून सांगावे लागतात. साधारणपणे नित्य कसला ना कसला व्यायाम करणार्या लोकांना तो न करणार्यापेक्षा दहा वेगळे फायदे होत असतात. त्यांचे महत्त्व असे आहे.
Similar questions