व्यक्तिमत्त्व विकासासाठी कोणती कौशल्ये अवगत करणे आवश्यक आहे ?
Answers
Answer:
शिक्षण. अमोल ... निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. ... या विकासाचा विचार.
Answer:
व्यक्तीचे व्यक्तिमत्व ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. माणसाच्या व्यक्तिमत्त्वा वरुनच त्याची पारख केली जाते. व्यक्तिमत्व विकासासाठी काही कौशल्य अवगत असणे गरजेचे असते.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संभाषण प्रक्रिया किंवा संभाषण कौशल्य. माणसांचे व्यक्तिमत्त्व विकासासाठी संभाषण कौशल्य व उच्च दर्जाचे असले पाहिजे.
व्यक्तीचे चालण्याची, बोलण्याची पद्धत देखील खूप महत्त्वाचे असते. इतरांना नेहमी आदर दिला पाहिजे व सर्वांशी सन्मानाने आणि बोलले पाहिजे.
कुणाशीही बोलताना कुणाचे मन दुखावनार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सतत इतरांना मदत करण्याची भावना असली पाहिजे.
दुसऱ्यांना समजून घेणे हे व्यक्तिमत्वाचा सर्वात महत्त्वाचे गुण आहे. आपली प्रत्येक गोष्ट इतरांवर न लादता, त्यांचे काय म्हणने आहे हे ऐकले पाहिजे हा देखील व्यक्तिमत्वाचा महत्वाचा पैलू आहे.