Art, asked by 9529737340, 2 months ago

व्यक्तिमत्व विकासात पुस्तकाचे महत्व याविषयी तुमचे मत 10 ते 12 ओळीत स्पष्ट करा

Answers

Answered by tambolijavid806
0

Explanation:

vyaktimatva vikasat pustakanche mahtva ya vishyi tumche mat 10 te 12 olit spashta bkara

Answered by rajraaz85
8

Answer:

प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व वरूनच त्या व्यक्तीची पारख केली जाते. तुमचे व्यक्तिमत्व कसे आहे त्यावरूनच लोक तुमच्याबद्दल मत बनवत असतात त्यामुळे व्यक्तिमत्त्व चांगले असणे खूप गरजेचे आहे.

व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व विकासात पुस्तकांचे खूप मोठे योगदान असते. कारण आपण ज्या प्रकारचे पुस्तक वाचतो त्या पुस्तकांतील विचारांचा आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो. चांगले पुस्तक वाचल्यामुळे आपल्यावर अनेक संस्कार होत असतात व चांगले मूल्य आपल्या व्यक्तीमत्वात येत असतात.

नैतिक मूल्यांचा व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम होतो व तो व्यक्तीच्या कृतीतून दिसत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त पुस्तके वाचले पाहिजे. पुस्तकांच्या माध्यमातून आपले वैचारिक ज्ञान वाढते व बौद्धिक पातळी वाढते. काय चांगले व काय वाईट हे ठरवण्याची कुवत पुस्तकामुळे माणसात येते. म्हणून व्यक्तिमत्व विकासात पुस्तकाचे खूप महत्त्व आहे.

Similar questions