व्यसनाधीनतेची कारणे व परिणाम स्पष्ट करा
Answers
Answer:
व्यसनाधीनतेमागील कारणे
भावनिक असुरक्षितता, प्रेमाचा अभाव
कोणतीही व्यक्ती व्यसनाधीन होण्यासाठी मद्यसेवन करत नाही. काल्पनिक अथवा खर्याखुर्या प्रश्नांपासून दूर जाण्यासाठी दारु किंवा अंमली पदार्थांचा वापर केला जातो.
पालक प्रेम द्यायला असमर्थ ठरले, पालकांमध्ये मतभेद असले, पालक हुकुमशाही प्रवृत्तीचे असले तर बालवयातच मुलांच्या मनावर ओरखडे उमटतात. या कारणामुळे मुले व्यसनाकडे वळण्याची शक्यता असते.
पैशांचा गैरवापर, मार्गदर्शनाचा अभाव
सहज उपलब्ध होणारा पैसा व्यसनाकडे नेण्याची शक्यता असते.
आजच्या बदलत्या वातावरणात चंगळवादाला बळी पडलेल्या पालकांचे अंधानुकरण करणारी मुले नकळत व्यसनाला बळी पडत आहेत.
उत्सुकता
व्यसन करणार्या पालकांना पाहून मुलांनाही धूम्रपान किंवा मद्यसेवनाचे आकर्षण वाटू लागते.
या टप्प्यावर मार्गदर्शन मिळाले नाही तर मुले भरकटतात. त्यांना विविध व्यसनांची चव घ्यावीशी वाटते. हीच उत्सुकता मुलांना व्यसनाच्या जाळ्यात अडकवते.
परिणाम:-
सिगारेट ओढणे, दारू पिणे, वा अन्यामादक पदार्थांचे सेवन करणे, मावा (सुगंधी तंबाखू) खाणे इत्यादींमुळे दात, घसा, फुप्फुसे, हृदय, जठर, मूत्रपिंडे, तसेच श्वसनसंस्था आणि पचनसंस्था यांचे विकार होऊन कर्करोग व इतर भयंकर रोग होतात.
व्यसनांचे मानसिक दुष्परिणाम :
व्यसनांमुळे मन व बुद्धी अकार्यक्षम बनून मानसिक त्रास होतो. तसेच व्यसनांची पूर्तता करण्यासाठी बरेच पैसे खर्च होतात; म्हणून व्यसन म्हणजे ‘विकतचे दुखणे’ होय.