Science, asked by vaibhavkute0396, 10 months ago

व्यसनाधिनतावर माहिती लिहा.​

Answers

Answered by fistshelter
6

Answer: व्यसनाधीनता म्हणजे व्यसनाच्या अधीन होणे. व्यसन म्हणजे एखाद्या गोष्टीची प्रमाणाबाहेर सवय लागणे. मग ती गोष्ट चांगली अथवा वाईट असू शकते.तसेच व्यसन हे एखाद्या व्यक्तीचे किंवा मग वस्तूचे असू शकते.

व्यसन लागण्याचे मुख्य कारण म्हणजे आपण ज्या व्यक्तींच्या, वातावरणाच्या सहवासात असतो त्या व्यक्ती अथवा वातावरण. म्हणजेच व्यक्तींच्या, वातावरणाच्या संगतीने आपल्याला व्यसन लागू शकते. उदाहरणार्थ एखाद्याला मित्र अभ्यासू असेल किंवा आजूबाजूचे वातावरण अभ्यासाला पूरक असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा अभ्यासाचे चांगले व्यसन लागेल. परंतु जर मित्र नशा करत असेल तर त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला पण नशा करण्याचे वाईट व्यसन लागेल.

सध्याच्या युगात वाईट गोष्टींचे व्यसन वाढत चालले आहे. यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. त्यामुळे याबाबत जागरूकता निर्माण करणे फार गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा.

Explanation:

Answered by topanswers
5

व्यसनाधीन होणे म्हणजे एखादी गोष्ट सतत मर्यादेबाहेर करत राहणे. चांगल्या गोष्टी सतत करत राहिल्या तर तेही एक प्रकारचं व्यसनच म्हणावं लागेल. पण सर्वसाधारणपणे वाईट गोष्टीचा नाद लागण्याला आपण व्यसन म्हणतो.  

दारू पिणे, सिगारेट ओढणे, जुगार खेळणे, तसेच इतर अनेक शरीराला आणि संसाराला घातक अशा गोष्टी प्रमाणाबाहेर करणे याला व्यसनाधीनता म्हणता येईल.

सद्य परिस्थितीतील समस्यांना तोंड देणं अवघड वाटू लागलं की लोक व्यसनाधीन होतात. वर्तमानातील समस्या टाळणे हा त्यामागचा उद्देश असतो. ते व्यसन केल्यावरच मनाला आणि शरीराला एक प्रकारचं समाधान वाटतं या भ्रामक कल्पनेतून हे व्यसन वाढत जातं.

तरुण मुलांना व्यसन लागण्याचं प्रमाण जास्त आहे. मित्रांबरोबर त्यांना या व्यसनांची ओळख होते. आणि हळू हळू ते प्रमाण वाढत जाऊन ही मुलं व्यासनाधीन होतात.  

मनावर ताबा ठेवणे आणि मन चांगल्या गोष्टीत रमवणे हा यावरचा उपाय आहे.

Similar questions