Sociology, asked by Dion8839, 1 year ago

व्यवसाय चालू करताना कोणते घटक लक्षात घ्यावे लागतात ?

Answers

Answered by heydude123
1

Hola mate... !!

here is your answer....

(1) कार्याचे प्रमाण निश्चित करणे. प्रमाण जर निश्चित असेल, तर तुलना करणे वा मोजमाप करणे सोपे जाते. प्रमाण भौतिक स्वरूपात, उत्पन्नाच्या स्वरूपात, खर्चाच्या वा परिव्ययाच्या स्वरूपात किंवा अदृश्य स्वरूपात ठरविले जाते. अपेक्षित उत्पादन-वस्तूंची संख्या वा त्यांचे वजन, उत्पादनासाठी लागणारे श्रम, वेळ (कामाचे तास) ही भौतिक प्रमाणे होत. जेव्हा अपेक्षित कामाचे प्रमाण हे किती उत्पन्न मिळावे या संदर्भात स्पष्ट करण्यात येते, तेव्हा त्याला उत्पन्न प्रमाण असे म्हणतात. परिव्यय प्रमाणात विशिष्ट प्रकारचे काम करण्याकरिता करावा लागणारा खर्च निश्चित केला जातो. कामगारांचे प्रेरण, प्रशिक्षण इ. कार्याचे मूल्यमापन भौतिक वस्तूंच्या स्वरूपात किंवा पैशाच्या स्वरूपात करता येत नाही, म्हणून त्यांना अदृश्य प्रमाण असे म्हटले जाते.

(२) नियंत्रण प्रक्रियेतील दुसरा टप्पा म्हणजे ठरवून दिलेले प्रमाण व प्रत्यक्षात झालेले उत्पादन यांची तुलना करणे. या तुलनेमुळे ठरवून दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे कार्य किती प्रमाणात झाले, हे समजण्यास मदत होते व व्यावसायिक प्रगतीचाही अंदाज येतो. योजनेप्रमाणे कार्य करण्यात अडथळा ठरणारे घटक दूर करता येतात. कार्यवाहीची निष्पत्ती योजनेनुसार होत नसेल, तर कार्यवाहीत आवश्यक ते फेरबदल करावे लागतात. प्रभावी नियोजनाशिवाय नियंत्रण यशस्वी होऊ शकत नाही. परिणामकारक नियंत्रणासाठी उत्कृष्ट व वास्तववादी योजना, प्रगती-अहवाल तयार करण्याची कार्यक्षम व स्थायी अशी व्यवस्था, निर्धारित योजना व प्रगति-अहवाल यांत विचलन असल्यास त्याकरिता सुधारणाविषयक कार्यवाही करण्याची व सर्व कार्याची समीक्षा करण्याची व्यवस्था संघटनेत असणे जरूरीचे आहे.

Hope this will help you.

Please mark as brainlist...

Similar questions