व्यवसायाचा पर्यावरणावर होणारा परिणाम वर टिप द्या.
Answers
Please Ask Relevant Questions
Answer:
व्यवसाय आणि औद्योगिकीकरणामुळे देशाचा आर्थिक विकास जर ही होत असला,तरीही यामुळे पर्यवरणावर गांभीर परिणाम होतात.
व्यवसाय आणि औद्योगिकीकरण वाढवण्यासाठी वृक्ष आणि जंगलतोड होत आहे.याचा परिणाम पर्यावरणावर होतो.त्यामुळे हवामानात बदल आणि पावसाचे प्रमाण कमी होत आहे. प्रदूषणात वाढ होत आहे.उद्योगांमधून आणि कंपनींमधून निघणारा धूर हा वायु प्रदूषणाचा प्रमुख कारण आहे.त्यामुळे हवामानात बदल व हरितगृह परिणाम सारख्या समस्या होत आहेत सोबत आरोग्यावरही याचे परिणाम होतात.
व्यवसाय ध्वनि प्रदूषणासाठी सुद्धा जबाबदार आहे,ज्यामुळे प्राण्यांना आणि लोकांना त्रास होतो,तसेच उद्योगांमध्ये वापरला जाणाऱ्या विकिरणांचा पर्यावरणावर,मनुष्य आणि प्राण्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.उद्योगांमधून आणि कंपनींमधून कचरा आणि पाणी नद्यांमध्ये किंवा जमीनीवर कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जातात,ज्यामुळे जलचर जीवनावर,लोकांवर,पर्यावरणावर परिणाम होतो,त्यामुळे जल प्रदूषण आणि भूमी प्रदूषण होते.
अशा प्रकारे,व्यवसायाचा पर्यवरणावर खूप वाईट परिणाम होतो.
Explanation: