व्यवसायाची संकल्पना स्पष्ट करा
Answers
Answered by
11
=====>> व्यवसाय : (बिझ्निस्). वस्तूंचा वा सेवांचा समाजाला पुरवठा करणारी व्यवस्था. व्यवसायाचा संबंध आर्थिक मूल्य निर्माण करणाऱ्या सर्व प्रकारच्या संस्थांशी असतो. व्यवसायात समाविष्ट होणाऱ्या विभिन्न क्रियांचा नागरिकांच्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाशी निकटचा संबंध असतो. व्यवसाय या संज्ञेमध्ये संपत्ती निर्माण करण्याच्या तसेच संपत्ती मिळविण्याच्या उद्देशाने करण्यात येणाऱ्या सर्व क्रियांचा समावेश होतो. मात्र केवळ संपत्तीची निर्मिती वा संपादन हे व्यवसायाचे एकमेव उद्दिष्ट नव्हे, तर सामाजिक उपयोगितेच्या दृष्टीने मानवी गरजांची पूर्तता करणे, हेही व्यापक उद्दिष्ट असते. व्यवसाय या सुसंघटित प्रक्रियेचे दोन पक्ष असतात व त्या दोहोंचे परस्परहित साधणे आवश्यक असते.
_______________________________
Similar questions