व्यवसायाची वैशिष्टये स्पष्ट करा.
Answers
Answered by
8
HER'S THE ANSWER
व्यवसाय-संघटनेमध्ये उपयोगात येणाऱ्या साधनसामग्रीचे आणि व्यक्तींचे नियंत्रण करणारी व पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योजिलेली सुविहित यंत्रणा म्हणजे व्यवस्थापन होय. उत्पादनघटकांना संघटित व दिग्दर्शित करून त्यांच्यापासून संपत्ती निर्माण करण्याचे काम व्यवस्थापनाचे असते. थिओ हेमन या प्रसिद्ध व्यवस्थापनतज्ज्ञाने प्रोफेशनल मॅनेजमेंट थिअरी अँड प्रॅक्टिस या ग्रंथात व्यवस्थापन या शब्दाचे तीन अर्थ सांगितले आहेत : कोणत्याही संघटनेत उच्च पदावर कार्य करणाऱ्या अधिकारीवर्गाला उद्देशून व्यवस्थापन ही संज्ञा वापरली जाते. दुसरा अर्थ म्हणजे व्यवस्थापन ही एक ज्ञानशाखा असून ते एक शास्त्रही आहे. या ज्ञानशाखेत व्यवस्थापनाचे सिद्धांत, कार्यपद्धती इत्यादींबाबत अभ्यास केला जातो. व्यवस्थापनाच्या तिसऱ्या अर्थानुसार व्यवस्थापन ही एक प्रक्रिया असून तीत व्यवसायाचे नियोजन, संघटन, निदेशन वा संचालन, अभिप्रेरणा, समन्वय व नियंत्रण इ. कार्यांचा समावेश होतो. व्यवस्थापन म्हणजे प्रामुख्याने निदेशन असे म्हणता येईल.
व्यवसाय व्यवस्थापनात कर्मचारी-निवड, प्रशिक्षण, निरीक्षण आणि मनुष्यबळविकास यांचाही अंतर्भाव होतो. व्यवसाय प्रशासन ही वेगळी संकल्पना असून तो व्यवस्थापनाचाच एक भाग मानला जातो; परंतु काही व्यवस्थापनतज्ज्ञांच्या मते व्यवस्थापन व प्रशासन या संकल्पनांमध्ये निश्चित फरक आहे. ऑलिव्हर शेल्डन या ब्रिटिश व्यवस्थापनतज्ज्ञाच्या मते उद्योगामध्ये प्रशासनाचे कार्य व्यवसाय संघटनेची धोरणे निश्चित करणे; वित्त, उत्पादन व वितरण यांमध्ये समन्वय प्रस्थापित करणे; संघटनेचे क्षेत्र निश्चित करणे आणि संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता निर्माण केलेल्या यंत्रणेवर नियंत्रण ठेवणे हे असते. (द फिलॉसॉफी ऑफ मॅनेजमेंट, १९२३). व्यवस्थापनाचे कार्य प्रशासनाने ठरवून दिलेल्या धोरणांची त्यांतील मर्यादांच्या आधीन राहून अंमलबजावणी करणे व विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघटना राबविणे हे असते.
व्यवसाय संघटनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दोन प्रकारे वर्गीकरण करता येते : (१) उत्पादनकाऱ्यात किंवा कारखान्यात प्रत्यक्षपणे भाग घेणारे कर्मचारी (२) कर्मचाऱ्यांना निश्चित कामे सोपवून त्यांच्याकडून ती नियोजित कामे करवून घेणारे अधिकारी. दुसऱ्या प्रकारच्या सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश व्यवस्थापनामध्ये होत असतो. उद्योगव्यवसायाच्या प्रमुख व्यवस्थापकापासून ते साध्या मुकादमापर्यंत अनेक अधिकाऱ्यांचा या वर्गात समावेश होतो. या सर्व अधिकाऱ्यांना काऱ्याची योजना तयार करणे, आवश्यक ती संघटना उभारणे, कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, त्यांना आवश्यक ते आदेश देणे, संदेशवहनाची सुयोग्य व्यवस्था करणे, कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या कामात समन्वय साधणे व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अशी अनेक कार्ये करावी लागतात. व्यवसायाचा आकार जेवढा मोठा आणि कामगारांची संख्या जेवढी जास्त, त्या प्रमाणात व्यवस्थापकीय कार्य करणाऱ्यांची संख्यासुद्धा मोठी असते. व्यवस्थापकीय क्रिया करणाऱ्या व्यक्ती विविध स्तरांवर त्यांना सोपविलेली कार्ये पार पाडीत असतात. साधारण आकाराच्या व्यवसाय संघटनेत उच्च स्तरीय व्यवस्थापन, मध्यम स्तरीय व्यवस्थापन व निम्न स्तरीय व्यवस्थापन असे तीन स्तर असल्याचे आढळून येते. IF YOY LIKE CLICK ON THANK YOU AND IF ANY OTHER QUERIES COMMENT

3
व्यवसाय ही एक आर्थिक कृती आहे.प्रत्येक व्यवसायाच्या घडामोडींमध्ये देवाणघेवाण केली जाते.नफा मिळविणे हा कोणत्याही व्यवसायाचा मूळ उद्देश आहे.
Similar questions
Social Sciences,
8 months ago
Math,
8 months ago
Math,
1 year ago
Hindi,
1 year ago
Math,
1 year ago