Geography, asked by pandhurangjadhav92, 1 month ago

व्यवसाय या मुद्यावर तुमचे मत व्यक्त करा? ​

Answers

Answered by ITZURADITYAKING
5

Answer:

'कंपनी' या व्यवसाय संघटनेचे पहिल्या दोन संघटनांच्या ... अपेक्षित कामगिरी करू शकत नाहीत

Answered by artikushwaha540
3

Answer:

व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीकरिता निर्माण केलेली व्यवस्था. कोणत्याही अर्थव्यवस्थेत विविध प्रकारचे व्यवसाय व उत्पादन करणाऱ्या संस्था मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार करणारे व्यवसाय, विमा व्यवसाय, बँकिंग व्यवसाय, वाहतूक व्यवसाय, उत्पादन करणारे व्यवसाय व शेती व्यवसाय यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. यांतील काही व्यवसाय सार्वजनिक किंवा सरकारी क्षेत्रात, तर काही व्यवसाय खाजगी क्षेत्रात आहेत.

हे सर्व व्यवसाय यशस्वी रीतीने चालविण्यासाठी योग्य व अनुरूप अशा संघटनेची गरज असते. व्यवसायात गुंतलेल्या भांडवलाची मालकी व नियंत्रण कोणाकडे आहे, यावर त्या व्यवसायाची संघटना कशी असेल, हे अवलंबून असते. परंतु त्याच्या एकूण विस्तारावर मर्यादा पडतात. भागीदारी संस्थेत जादा भांडवल व मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकते, परंतु त्यालाही मर्यादा पडतात. अलीकडच्या काळात संयुक्त भांडवल कंपनी (जॉईट स्टॉक कंपनी) आणि व्यवसाय निगम हे व्यवसाय संघटनेचे प्रकार मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करण्यासाठी हे प्रकार खूपच उपयुक्त ठरले आहेत. कंपनीमध्ये वाढती नफेखोरी व संपत्तीचे अवास्तव केंद्रीकरण हे धोके निर्माण होत असल्याने सहकारी संस्थांची स्थापना मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेली आहे. सार्वजनिक क्षेत्रात सरकारी खाते, सरकारी कंपनी व सार्वजनिक निगम हे संघटनाप्रकार प्रचलित आहेत.

व्यवसायाचे स्वरूप, आकार व इतर वैशिष्ट्यपूर्ण बाबी यांवर संघटनेचे स्वरूप अवलंबून असते. उत्पादन किंवा व्यापार किंवा सेवा यांच्या स्वरूपानुसार व्यवसाय संघटनेचा प्रकार ठरतो. व्यवसायाला लागणारे भांडवल, साधनसामग्री व मनुष्यबळ या गोष्टीँचाही विचार संघटनेचा प्रकार निवडताना करावा लागतो. सुरुवातीला विशिष्ट प्रकारची संघटना निवडली, तरी पुढे तो प्रकार बदलता येतो. मात्र त्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते. सध्या प्रचलित असलेल्या व्यवसाय संघटनेच्या काही प्रकारांची माहिती पुढे दिली आहे. भागीदारी, व्यवसाय निगम, संयुक्त भांडवल कंपनी यांवर मराठी विश्वकोशात यथास्थळी स्वतंत्र नोंदी असल्याने त्यांचे थोडक्यात माहिती इथे दिली आहे.

Similar questions