वचन बदला झाड पान फुल
Answers
Answer:
please mark as brainliest and follow
Explanation:
ज्या नामावरून एकाच व्यक्ती अथवा वस्तूचा बोध होतो ,तेव्हा ते त्या नामाचे एकवचन असते.
उदाहरणार्थ:फुल , झाड , वही
Answer:
वचन :-
कोणत्याही नामावरून त्याने दाखवलेल्या वस्तूंची संख्या एक आहे की , एकापेक्षा अधिक आहे हे
समजते ,त्यालाच त्या नामाचे वचन म्हणतात .
वचनचे दोन प्रकार आहेत .
एकवचन :- ज्या नामावरून एकाच व्यक्ती अथवा वस्तूचा बोध होतो ,तेव्हा ते त्या नामाचे एकवचन असते.
उदाहरणार्थ:फुल , झाड , वही
अनेकवचन :- ज्या नामावरून अनेक व्यक्ती अथवा वस्तूंचा बोध होतो ,तेव्हा ते त्या नामाचे अनेकवचन असते. उदाहरणार्थ:फुले , झाडे , वह्या
खालील अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या.
१) एक घर - अनेक घरे
२) एक सफरचंद - अनेक सफरचंदे
३) एक फूल - अनेक फुले
४) एक चिमणी - अनेक चिमण्या
वरील वाक्यांतील -
१) घर - या नामावरून एका घराचा बोध होतो.
घरे - या नामावरून अनेक घरांचा बोध होतो.
२) सफरचंद - या नामावरून एका सफरचंदाचा बोध होतो.
सफरचंदे - या नामावरून अनेक सफरचंदांचा बोध होतो.
३) फूल - या नामावरून एका फुलाचा बोध होतो.
फुले - या नामावरून अनेक फुलांचा बोध होतो.
४)चिमणी - या नामावरून एका चिमणीचा बोध होतो.
चिमण्या - या नामावरून अनेक चिमण्यांचा बोध होतो.