वचन बदला :- ( marathi )
१. फांदी -
२. खिडकी -
Answers
Answer:
१.फांदी:फांद्या
२.खिडकी:खिडक्या
plz mark me as brainiest
Answer:
फांदी - फांद्या
खिडकी - खिडक्या
Explanation:
वचन :
वचन म्हणजे एखाद्या नामावरून ते नाम एक आहे किंवा अनेक याचा उल्लेख होतो त्याला वचन असे म्हणतात.
नामा चे दोन प्रकार पडतात.
एक वचन-
ज्या वेळी दिलेल्या नावावरून फक्त एका नामा चा उल्लेख होतो त्यावेळेस त्याला एक वचन असे म्हणतात.
उदाहरणार्थ-
१. खूप छान नदी आहे.
२. तो आंबा खातो.
३. शाळा सात वाजता चालू होते.
वरील वाक्यात नदी, आंबा, शाळा हे नाम फक्त एकच संख्या दाखवते म्हणून ते एक वचनी नाम आहेत.
अनेक वचन-
जेव्हा दिलेल्या वाक्यातील नामावरून एकापेक्षा जास्त गोष्टींचा उल्लेख होतो त्यावेळेस त्याला अनेक वचन असे म्हणतात.
उदाहरणार्थ-
१. तो आंबे खातो.
२. किती उंच इमारती आहेत.
३. महाराष्ट्रात खूप नद्या आहेत.
वरील वाक्यात आंबे इमारती नद्या हे शब्द एकापेक्षा जास्त संख्येचा उल्लेख करतात त्यामुळे ते अनेक वचनी नाम आहेत.