वचन ओळखा.
1) गाणी 2) विमाने. 3) घड्याळ 4) वाद्य
Answers
Answer:
- गाणी = अनेकवचन
- विमाने = अनेकवचन
- घड्याळ = एकवचन
- वाद्य = एकवचन
Explanation:
सोप्या मराठी निबंधसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट दया.
www.sopenibandh.com
- गाणे- अनेकवचन
- विमाने -अनेकवचन
- घड्याळ -एकवचन
- वाद्य- एकवचन
दिलेल्या प्रश्नानुसार आपल्याला दिलेल्या शब्दांचे वचन ओळखायचे आहे.
वचन म्हणजे काय?
एखादा शब्द बोलल्यानंतर ती वस्तू एक आहे किंवा अनेक याचा बोध ज्या गोष्टीच्या माध्यमातून होतो त्याला वचन असे म्हणतात.
वचनाचे दोन प्रकार पडतात.
एकवचन आणि अनेकवचन
अनेकवचन -
एखादा शब्द उच्चारल्या नंतर एकापेक्षा जास्त गोष्टींचा उल्लेख होत असेल त्यावेळेस तो शब्द अनेकवचनी शब्द असतो.
उदाहरणार्थ - गाड्या, वह्या, पंखे ,झाडे, इमारती, गावे, शहरे, बाहुल्या, रस्ते, पुस्तके, बादल्या,इत्यादी
वरील प्रत्येक शब्दावरून एकापेक्षा जास्त गोष्टींचा उल्लेख होतो म्हणून त्याला अनेक वचन असे आपण म्हणतो.
एकवचन -
ज्यावेळेस एखादा शब्द बोलल्यानंतर एकच गोष्टीचा उल्लेख होतो त्यावेळेस ही गोष्ट एक वचनी आहे असे म्हणतात.
उदाहरणार्थ - झाड , इमारत , गाव, शहर, रस्ता, मुलगी , मुलगा, स्त्री , पुरुष पुस्तक, बादली, गाडी, वही
वरील दिलेल्या उदाहरणांमधील प्रत्येक शब्द हा फक्त एकच वस्तूचा उल्लेख करतो म्हणून अशा शब्दांना आपण हे शब्द एक वचनी आहेत असे समजतो.
वचनाबद्दल अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा-
https://brainly.in/question/26857939
https://brainly.in/question/23229554
#SPJ3