India Languages, asked by akky7777, 1 year ago

vachanache mahatv marathi essay​

Answers

Answered by pranav358
18
वाचनाचे महत्व आपण आपल्या शालेय जीवनापासून ऐकत आलोय. प्रत्येकजण आपल्याला वाचन किती महत्वाच आहे हे सांगत असतो. परंतु आपण खरचं वाचन करतो का? वाचायला आवडते का? वाचून काही फायदा होतो का? लोक वाचनाला एवढे महत्व का देतात?
१. वाचनामुळे मेंदुला चालना मिळते नवनवीन शब्दांमुळे त्याच्यात प्रगती होत असते. वाचनामुळे आपल्याला नवनवीन माहीती मिळतेच तसेच ज्ञानात भर पडते.

२. सध्या आसपास अनेक मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत. दुरदर्शन, संगणक व त्यावर खेळले जाणारे खेळ, मोबाईलवरील खेळ अशी साधने आपल्याला मानसिक आनंद देतात परंतु वाचनामुळे आपण लेखकाने लिहीलेल्या ठिकाणी जाऊन आल्याचा आनंद मिळतो. आपण त्यातील प्रत्येक पात्र जगत असतो.

३. वाचताना आपण लेखकाचं म्हणणे ऐकत असतो. सध्याच्या जीवनात ऐकण्यासाठी कोणाला वेळ नसतो. वाचनामुळे आपल्याला इतरांच ऐकायची सवय लागते. ऐकण्यासाठी संयम असायला हवा. वाचनामुळे आपण आपोआप संयम राखायला शिकतो.

४. अनेक नोकरीच्या संधी वाचनामुळे निर्माण होतात. अनेक ठिकाणी वाचनीय ज्ञान चांगले असते त्याला उत्तम प्रकारच्या नोकरीच्या संधी असतात. उत्तम वाचन असेल तर काम करताना ईमेल लवकर समजून घेण्यास मदत होते. त्यामुळे कामाची गती वाढते.

५. सामान्य ज्ञान वाढते. आपल्याला जर वाचनाची आवड असेल तर मित्रमंडळी किंवा लोकांमध्ये वावरताना आपण एखाद्या विषयावरील चर्चेत आपले मुद्दे योग्य प्रकारे मांडू शकतो. त्यामुळे त्यांच्यात मिसळण्यात मदत होते. वाचनामुळे आपण आपली मते ठळकपणे मांडू शकतो.

वाचनाचा आनंद लुटा. आपल्याला आवडणार्‍या विषयापासून सुरु करा. सवय आपोआप लागेल.

plz mark me brainliest

tanmaib9952: mala maja yete tula chivayala hehehe......☺
akky7777: hey u all pls stop..
tanmaib9952: kk sry to disturb u
pranav358: sorry
Similar questions