vahan pradushan essay in marathi
Answers
*Vehicle Pollution*
*वाहन प्रदूषण*
एकविसाव्या शतकात विज्ञानामुळे आपल्या देशात बरेच काही बदल दिसून येतात. आदिमानवाच्या काळापासून आपली वाढ आपल्याला दिसून येते. आधी माणूस चालायला शिकला, त्यानंतर त्याने दुचाकी व चारचाकी वाहने बनवून आपले जीवन सोपे केले. हळूहळू या वाहनांमध्ये बदल होऊन पेट्रोल व डिझेल गाड्या चालू लागल्या. एकीकडे हे बद्दल दिसण्यात येत होते तर दुसरीकडे प्रदूषण आपले मूळ घट्ट करायला सुरुवात करत होते. या वाहनांमध्ये हे इंधन जाळल्या मुळे विविध हानिकारक वायू जसे कार्बन-डाय-ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड इत्यादी वाढू लागले. मोठ मोठाले कारखान्यांमुळे पाण्याचे प्रदूषण व हवेचे प्रदूषण देखील वाढू लागले. प्लास्टिकचा शोध लागल्यामुळे अजूनही समस्या गंभीर होऊ लागली. वर्षानुवर्ष नष्ट न होणारे हे प्लास्टिक खूप हानिकारक परिणाम दाखवत आहे. लोकांची व गाड्यांची संख्या वाढल्यामुळे वातावरण तर दूषित झालेच पण ध्वनिप्रदूषण देखील खूप वाढले.
रोजच्या धावत्या जीवनात आपण सहज काही गोष्टी दुर्लक्षित करतो. उदा. रोज ऑफिस ला जाताना कुमार काका स्कूटर ला स्टार्ट मारून ऑफिस ला तर पोचतात पण गाड्या,स्कूटर, दुचाकी हे जे प्रदूषण पसरवत आहेत ते खूप हानिकारक आहे. गाड्यांच्या धुरामध्ये कार्बन डायऑक्साइड, मोनो ऑक्साईड्स असे हानिकारक रसायन/वायू असतात ज्याने करून आपला ओझोन लेयर कमी होत चालला आहे.
माझ्या डोक्यात इलेक्ट्रिक वाहने/दुचाकी बनवण्याचा अथवा त्यांची विक्रीचा विचार डोक्यात बरेच वेळा आला आहे. ही वाहने कुठच्याही प्रकारचा धूर सोडत नाही आणि म्हणून ते पर्यावरण दूषित करत नाहीत. जास्तीत जास्ती लोकांनी ही वाहने वापरावी म्हणून मी स्वतः त्या गाडीचा वापर करीन व लोकांना त्यांचे फायदे, आणि तोटे देखील संगीन कारण लोकांना दोन्ही बाजू समजायला हव्यात. प्रदूषणाला नसतं करण्यासाठी आपल्याला खालील प्रमाणे निर्णय घ्यावे लागतील:
इलेक्ट्रिक गाड्यांचा शोध, प्लास्टिक बंदी, ध्वनिप्रदूषण कमी करणे म्हणजे हॉर्न न वाजवणे, कारखान्यातून बाहेर पडत असलेले घाणेरडे पाणी स्वच्छ करूनच नदीमध्ये सोडणे.