Art, asked by gaikwadankita659, 6 months ago

vahatuk suraksha nibandh in Marathi ​

Answers

Answered by Molly2009
18

Answer:

Explanation:

वाहतूक शाखेची प्रमुख दोनच कार्य आहेत. एक वाहतूक सुरळीत ठेवणे आणि दुसरे म्हणजे आवश्यक ती सर्व उपाययोजना करून रस्ते अपघातास प्रतिबंध करणे. यासाठी वाह्तूक नियंत्रण शाखेची तीन विभाग आहेत. पहिला विभाग वाहतूक शिक्षण दुसरा विभाग वाहतूकीचे नियोजन व तिसरा विभाग वाहतूक नियमांची अंमलबजावणी होत. यामध्ये वाहतूक शिक्षण हा पाया आहे. वाहतूक नियमांचे शिक्षण व नियोजनावर भर दिल्यास अंमलबजावणी वरील ताण कमी होतो, असे संशोधनांनी सिध्द केले आहे. वाहतूक शिक्षण विभाग अंतर्गत आर.एस.पी. हा विषय राबवण्यात येतो.

    आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत. ते देशाचे भविष्य आहेत व त्यांना संस्कारक्षम अशा शालेय वयात पदकाव्यात, वाहतूक नियमन, प्रथमोपचार, अग्निशमन व नागरी संरक्षण असे सव्रांगीण प्रशिक्षण दिल्यास ते कर्तव्य दक्ष नागरिक बनतील. या उदात्त हेतूने महाराष्ट्रातील बऱ्याच शाळामधून आर.एस.पी. हा विषय शिकविण्यात येत आहे.

  वाहतूक नियंत्रण: परस्परांपासून दूर असलेल्या दोन स्थानांच्या दरम्यान माणसे, माल व वाहने यांच्या होणाऱ्या हालचालीला वा स्थलांतराला वाहतूक म्हणतात. वाहतूक नियंत्रणात या हालचाली पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचेल अशा प्रकारे जलद, कार्यक्षम व शक्य तितक्या सुरक्षित करण्याचा अंतर्भाव होतो.

नियंत्रित करावयाची वाहतूक ही प्रकार वा कार्यमान यांच्या बाबतीत जितकी संमिश्र (उदा., मोटारगाड्या, बैलगाड्या, सायकली, दुचाकी शक्तिचलित वाहने यांची संमिश्र वाहतूक) असेल, तितक्या वाहनांचा ओघ महत्तम ठेवण्याच्या व सुरक्षिततेची खात्री होण्याच्या दृष्टीने अधिक समस्या उद्‌भवतात. सामान्यतः विशिष्ट प्रकारांच्या वाहतुकीचे नियंत्रण विशिष्ट पर्यवेक्षक प्रतिनिधींद्वारे अंमलात आणले जाते आणि या प्रतिनिधींमध्ये स्पर्धा व नियमन यांबाबत समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

प्रस्तुत नोंदीत रस्ता वाहतूक, रेल्वे वाहतूक, हवाई वाहतूक व जल वाहतूक यांच्या नियंत्रणाच्या पद्धती व समस्या यांची माहिती क्रमवार दिलेली आहे.

रस्ता वाहतूक नियंत्रण

खालील वर्णन प्रामुख्याने मोटारगाड्यांच्या वाहतूक नियंत्रणासंबंधी केलेले असले, तरी जनावरांनी ओढावयाच्या गाड्या, रिक्षा, सायकली, मोटारसायकली, स्कूटर वगैरे दुचाकी वाहने, ट्रॅक्टर ट्रेलर यांसारख्या वाहनांनाही ते थोड्याफार फरकाने लागू आहे.

सरकारी नियम: सर्व देश आपापल्या रस्त्यांवरील वाहनांचे व चालकांचे नियमन करतात. चालकांचे नियमन वय, चालविण्यात येणारे वाहन व आर्थिक तरतुदी यांनी तर वाहनांचे नियंत्रण नोंदणी, मालकी, यांत्रिक पात्रता, आवश्यक असणारी साहाय्यक साधने, आकारमाने व वजने यांच्याशी संबंधित असलेल्या विनिर्देशांच्या द्वारे केले जाते.

रस्ता सुरक्षा दलाचा उद्देश

१.आत्मरक्षा, जनसेवा व देशभक्तीची भावना वाढीस लावणे.

२. विद्यार्थ्यांमध्ये शिस्तबद्ध रीतीने राष्ट्रसेवा इच्छा निर्माण करणे.

३. सामाजिक व सार्वजनिक सेवा कार्य करण्याचा प्रत्यक्ष अनुभव देणे.

४. कोणत्याही संकटाच्या वेळी देशाचे व स्वतःचे रक्षण करणे.

५. जीवनाच्या फावल्या वेळेचा उपयोग सामान्य जनतेची सेवा करण्यात खर्ची घालणे.

६. विद्यार्थ्यांमध्ये आत्मअनुशासन, सेवा, सहिष्णुता, समता, बंधुता इत्यादी गुणांचा विकास करणे.

७. वाहतूक नियमांचा प्रचार व प्रसार करून रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करणे.

नियंत्रणविषयक नवीन संकल्पना : दोन रेडिओ स्थानकांवरून आलेले भिन्न संकेत एकाच वेळी का ग्राहीने ग्रहण केल्यास व त्यांच्यातील तफावतीची तुलना केल्यास त्या दोन स्थानकांपासूनच्या त्यांच्या अंतराविषयी अंदाज करता येऊ शकतो. या तत्त्वावर नवीन मार्गनिर्देशन पद्धतीचा विकास आधारलेला होता. अशा पद्धतीचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे.  

देशांतर्गत जलमार्गातील नियंत्रणामधील पुष्कळशा अडचणी या जलमार्ग व जलपाश यांची देखभाल करण्याविषयीच्या असतात [⟶ कालवे व देशांतर्गत जलमार्ग]. मात्र कालवे, देशांतर्गत समुद्र,नद्या व सरोवरे यांच्यातील वाढती वाहतूक पाहता तिच्या नियंत्रमासाठी अधिक प्रगत पद्धतींची गरज भासेल असे दिसते. महत्त्वाच्या पुष्कळ देशांतर्गत जलमार्गांमध्ये अधिक मोठ्या जहाजांसाठी एक वाट राखून ठेवलेली असते आणि किनाऱ्याची व पात्राची झीज रोखण्यासाठी जहाजाच्या वेगांवर काळजीपूर्वक नियंत्रण ठेवण्यात येते.

अणुऊर्जेवर चालणारी जहाजे उदयास आली असून त्यांच्या टकरी धोकादायक ठरू शकतील. त्यामुळे अशा टकरी टाळण्याला जलवाहतुकीच्या नियंत्रणाच्या विकासात अधिकच महत्त्व आले आहे. जहाजातील कर्मचाऱ्यांच्या विविध कामांचे वाढत्या प्रमाणावर स्वयंचालन होण्यासाठी देखरेख व नियंत्रण प्रणालीची योजना करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. यामुळे अखेरीस समुद्रातील जहाज मुख्यत्वे स्वयंनियंत्रित होण्याची शक्यता आहे. शिवाय भविष्यकाळात समुद्रावरील हवाई वाहतुकीच्या मार्ग निरीक्षणासाठी व नियंत्रणाकरिता कृत्रिम उपग्रह संदेशवहनात होणाऱ्या सुधारणा या बहुतकरून जहाज वाहतुकीच्या नियंत्रणासाठीही संयुक्त रीत्या उपयुक्त ठरतील.

Hope this helps :)

Answered by brainlysme13
4

वाहतूक सुरक्षा निबंध (मराठीत):

आजच्या युगात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत आहे. तथापि, ऑटोमोबाईल तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या खाली आले आहे. तरीसुद्धा, रस्त्यावर अनेक संभाव्य धोके आहेत ज्यामुळे दुखापत होऊ शकते किंवा मृत्यू देखील होऊ शकतो.

संभाव्य धोके रस्त्यांच्या खराब वर्तनापासून ते रस्त्यांची गतीशीलता किंवा अगदी खराब पायाभूत सुविधांपर्यंत असू शकतात. मद्यपान करून वाहन चालवणे, वेग मर्यादा ओलांडणे आणि सामान्यपणे रॅश ड्रायव्हिंग करणे यासारखे वर्तन रस्ते अपघातांमध्ये मोठे योगदान देते. शिवाय, महत्त्वाची माहिती देणार्‍या रस्त्यावरील चिन्हांकडे दुर्लक्ष करणे - जसे की क्रॉसरोड किंवा छेदनबिंदू हे देखील वाहन अपघातांचे प्रमुख कारण असू शकते. रस्त्याच्या सुरक्षेत वाहनाची देखभाल देखील महत्त्वाची भूमिका बजावते. उदाहरणार्थ, अनेक कार अपघात हे टायर फुटल्यामुळे होतात - जे टायर कमी फुगलेले असतात आणि त्यांच्या ऑपरेशनल लाइफच्या पलीकडे चालतात तेव्हा होतात.

#SPJ2

Similar questions