वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र तुमच्या मैत्रिणीला लिहा पत्र लेखन
Answers
Answered by
91
★ पत्र लेखन :
(पत्र पाठविणार्याचा पत्ता)
दिनांक : 24 ऑक्टोबर, 2021.
प्रिय अवनी,
कशी आहेस तू? मी इकडे मजेत आहे तू तिकडे खुशाल असावी ही ईश्वर चरणी प्रार्थना करते. आज सकाळी वर्तमानपत्रात तुझा फोटो पाहिला आणि ती बातमी वाचून तर माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवलेस तू.
या उत्तुंग यशाबद्दल तुझे मनापासून अभिनंदन. आधीपासूनच उत्तम संभाषण कौशल्य प्रभावी वाणी या अंगभूत गुणांमुळे वादविवादात तुझा हात कोणीही रोखू शकत नव्हता त्यातच तुझे कठोर परिश्रम अभ्यास वाचन याचे फळ तुला मिळाले. अशाच प्रकारे यश मिळत जावो अशी सदिच्छा.
काका-काकूंना माझा साष्टांग नमस्कार.
तुझी मैत्रीण
गौरी
Answered by
2
Explanation:
Patra pathaniya ka Pathar
Similar questions