वली पर्वत म्हणजे काय
Answers
Answer:
वली पर्वत). जगातील बहुतेक मोठ्या पर्वतश्रेणींची उत्पत्ती वलीकरणाच्या वा घड्या पडण्याच्या प्रक्रियेतून झालेली आहे. अत्यंत दीर्घकाल चालणाऱ्या या जटिल (गुंतागुंतीच्या) प्रक्रियेला ⇨गिरिजनन असे नाव आहे. वलित (घड्या पडून निर्माण झालेल्या) पर्वतांच्या निर्मितीच्या सुरुवातीला भूखंडानजीकच्या उथळ सागराचा तळ हळूहळू खाली वाकविला जाऊन पन्हाळीसारख्या ⇨ भूद्रोणी तयार होतात व त्यांच्यात १२ ते १५ किमी. जाडीचे अवसाद (गाळ) साचविले जातात. पृथ्वीच्या कवचाच्या ज्या हालचालीमुळे भूद्रोणी निर्माण होतात त्याच हालचालींचा पर्याप्त परिणाम म्हणून पुढे त्यांतील गाळांच्या थरांवर क्षैतिज म्हणजे आडव्या दिशेने दाब येऊन त्यांना घड्या पडतात. भूद्रोणी तयार होण्यास सुरुवात होण्यापासून तो तीतील गाळांच्या थरांना घड्या पडून ते वरच्या दिशेने उंचावले जाण्यापर्यंतचा गिरिजननाचा काळ कित्येक लक्ष वर्षांचा असू शकतो. उत्तर अमेरिकेतील ॲपालॅचिअन, यूरोपातील आल्प्स व आशियातील हिमालय ही गिरिजननाने निर्माण झालेल्या वलित पर्वतांची उत्तम उदाहरणे आहेत.