वनांचे उ पथविरतीय उपयोग लिया
Answers
Explanation:
नवीन वने निर्माण करणे आणि नैसर्गिक व मानव निर्मित वनांचे संरक्षण, संगोपन व विकास करून त्यांचे व्यवस्थापन करणाऱ्या तंत्रविद्येला वनविद्या, वनविज्ञान, वनशास्त्र किंवा वानिकी असे म्हणतात. वनविद्या ही अलीकडील काळात विकसित झालेली तंत्रप्रणाली आहे. या तंत्रप्रणालीत जीवशास्त्रे, भौतिकी, रसायनशास्त्र, गणित, अभियांत्रिकी वगैरे अनेक मूलभूत व अनुप्रयुक्त शास्त्रांचा उपयोग केलेला आहे. वनविद्येच्या प्रयोगात पुढील बाबींचा समावेश होतो : (१) वनसंवर्धन व वनसंरक्षण : यातच वन परिस्थितिविज्ञानाचाही समावेश आहे तसेच बीजोत्पादन व त्यांचे संग्रहण, रोपवाटिकांची कामे, रोपवननिर्मिती व वनीकरण, वृक्षांचे संरक्षण व संगोपण ही कामेही यात अतंर्भूत आहेत (२) वन−चित्रण व वनमापन (३) वृक्षांची तोडणी, लाकूड व अन्य वनोपजांचे (वन उत्पादनांचे) निष्कर्ष (अलग करण्याची क्रिया), त्यांचे प्रतवारीकरण, त्यांवरील प्रक्रिया व त्यांच्या विक्रीचे व्यवस्थापन (४) वन अभियांत्रिकी : वन व्यवस्थापनासाठी रस्ते, पूल इमारती इ. बांधणे व वनांतील विविध कामांसाठी यंत्रसामग्री वापरणे व निर्माण करणे (५) वन्य पशु-पक्षी संवर्धन : यात अभयारण्ये व राष्ट्रीय वनोद्याने यांचाही समावेश होतो व (६) सामजिक वनविद्या.