Science, asked by ranjanmah9654, 1 year ago

वनस्पतींची वाढ शरीराच्या ठराविक ठिकाणीच का होत असावी?

Answers

Answered by 200t
4

Hi

Can you please ask Your Question in English...

Hope it helps...

Answered by shmshkh1190
2

विभाजी ऊती या वनस्पतींच्या  वाढीसाठी आवश्यक असतात. वनस्पतींमध्ये ठराविक भागातच विभाजी ऊती असतात.  

या पेशींमध्ये रिक्तिका नसतात, या पेशी अतिशय क्रियाशील असून वनस्पतींची वाढ करणे हे या ऊतींचे प्रमुख कार्य आहे.  

वनस्पतींमध्ये तीन ठिकाणी विभाजी ऊती प्रामुख्याने आढळतात.  

१) मूळ आणि खोडांच्या टोकाशी प्ररोह विभाजी ऊती असतात, मूळ आणि खोडांची लांबी वाढविण्याचे कार्य त्या करतात.

२) पानांच्या देठाच्या व फांद्यांच्या तळाशी आंतरीय विभाजी ऊती असतात, फांद्यांची वाढ आणि पण फुलांची निर्मिती हे यांचे मुख्य कार्य असते.  

३) मूळ आणि खोडांच्या पार्श्व भागात ज्या ऊती आढळतात त्यांना पार्श्व विभाजी ऊती म्हणतात, मूळ, खोडांचा घेर वाढविण्याचे कार्य या ऊती करतात.  

वनस्पतींच्या ठराविक भागात असणाऱ्या विभाजी ऊतींमुळे वनस्पतींची वाढ ठराविक ठिकाणीच होत असते.

Similar questions