वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नावर संपूर्ण सजीव स्रुष्टी अवलंबून आहे . हरणे गवत खातात . वाघ हरणांना मारतात . सगळे गवत संपले तर वाघ पण मरतील का ?
Answers
Answer:
Explanation:
सांगा पाहू
० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली, त्यानंतर ती कशामुळे सुधारली ?
सांगा पाहू
० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ?
आपल्याला भूक का लागते ?
आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते.
पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही.
अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते.
जेव्हा आपण जास्त काम करतो, तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते.
आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते.
सांगा पाहू
० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ?
० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ?
० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का?
० सजीवांचे अन्न वेगवेगळे
० नवा शब्द शिका !
पेंड :
तीळ, शेंगदाणे, सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्हणतात.
आंबोण :
गूळ, धान्याची भरड आणि पेंड पाण्यात एकत्र कालवून ते मिश्रण आंबवल्यानंतर तयार होणारा पदार्थ.
प्रत्येक सजीवाला अन्नाची गरज असते, पण सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात नाहीत.
गाई, म्हशी पालणारे लोक त्यांना गवत तर देतातच, पण. आँबोण आणि पेंड सुद्धा द्रेतात. घोड्याना गवताबरोंबर भिजवलेला हरबरा देतात.
शेळ्या आणि मेंढ्या गवताबरोबर निरनिराळ्या झुडपांचा पालाही खातात. मांजरांना दूध मनापासून आवडते. पण त्यांना उंदीरही तितकेच आवडतात. मांज़रे, चिमण्या, कबुतरे, पारवे अशा पक्ष्यांना मारून खातात.
कुत्र्यांना आपण पोळी , भाकरी देतो. पण कुत्र्यांना मांस जास्त आवडते. मांजरांना आणि कुत्र्यांना पाळणारे लोक त्यांना मांस-मासळी खायला देतात.
जंगलात हरीण, नीलगाय, गवे असे प्राणी असतात. ते हिरवा पाला खाऊन राहतात.
जवळच्या शेतामध्ये पिके उभी असतील तर हे प्राणी पिकाचाही फडशा पाडतात.
जंगलात वाघ, सिंह असे प्राणीही असतात. ते इतर प्राण्याची शिकार करून त्याचे मास खातात.
असे हिंस्र प्राणी सहसा माणसांच्या वस्तीत येऊन शिकार करत नाहीत, पण कधीकधी त्यांची उपासमार होते. त्यांमुळे त्यांना माणसांच्या वस्तीत येण्याचे धाडस करणे भाग पडते. अशा वेळी ते गोठयातील गुरे मारून खातात.
माणसांच्या वस्तीत येण्याचे धाडस कोल्हे बऱ्याच वेळा करतात, पण कोल्ह्यांच्या अंगात वाघासारखी ताकद नसते. त्यांना गुरे मारणे अवघड जाते. कोल्हे बहुधा कोंबड्या पळवून नेतात.
जरा डोके चालवा.
० पिके तयार झाली की गोफणी का चालवाव्या लागतात ?बुजगावणी का उभी करून ठेवावी लागतात ?
पक्ष्यांच्या खाण्यातही विविधता दिसून येते. अनेक पक्षी धान्यांचे कण खातात शेतकरी आपल्या शेतामध्ये धान्ये, कडधान्ये अशी विविध पिके पिकवतो. पिके तयार झाली की त्यात दाणे भरू लागतात. ते दाणे खाण्यासाठी आजूबाजूचे पक्षी येतात. त्यातून पिकांची नासाडी होते. अशी नासाडी टाळण्यासाठी काय करतात ?
माणसांच्या वस्तीत धान्यांचे कण मिळवणे पक्ष्यांना सोपे जाते. स्थामुळे काही पक्षी माणसांच्या वस्तीजवळ राहणे पसंत करतात.
वेगवेगळे पक्षी इतरही काही पदार्थ खातात. कोंबड्या किड़े खातात कावळे मेलेल्या जनावरांचे मांस खातात. काही पक्षी झाडांची फळे खातात.
० अनेक छोटेछोटे प्राणी काय खात असतील बरे ?
ढेकूण माणसांचे रक्त शोषण करतात, तर गोचिडी गोठयातील ज़नावरांचे रक्त शोषण करतात.
पाली आणि सरडे किडे खातात. सुरवंट आणि काही कीटक झाडाझुडपांची पाने कुरतडून खातात. फुलपाखरे फुलांमधील रस शोधून आपली भूक भागवतात.
प्राणी परिसरात तयार होणारे आयते अन्न खातात, पण त्यांना अन्नाच्या शोधात फिरावे लागते.
माहीत आहे का तुम्हाला ?
डासांचे अनेक प्रकार असतात. बहुसंख्य प्रकारचे डास वनस्पर्तीमधील रसांचे शोषण करतात. फारच थोड्या प्रकारचे डास माणसांचे रक्त शोषतात.
० वनस्यतींचे अन्न
वनस्पतींनासुद्धा अन्नाची गरज असते, पण अन्नाच्या शोधात वनस्पती इकडे तिकडे फिरू शकत नाहीत. मग त्यांना अन्न कुठून मिळत असेल ? वनस्पती स्वत:चे अन्न स्वत:च तयार करू शकतात. वनस्पर्तीची मुळे जमिनीतून पाणी शोषुन घेतात. या पाण्यात ज़मिनीतील काही पदार्थ बिरघळलेले असतात. हे पाणी वनस्पतीच्या पानापर्यत पोचते.
पानावर अनेक छोटीछोटीं छिद्रे असतात. ती खूप लहान असतात. आपल्या डोळ्यांना ती दिसतही नाहीत. त्यांतून हवा पानांच्या आत शिरते. अशा प्रकारे पाणी आणि हवा पानामध्ये एकत्र येतात. पानावर सूर्यप्रकाश पडला, की हवा आणि पाण्यापासून वनस्पती अन्न तयार करतात.
वनस्पर्तीचे अन्न पानामध्ये तयार होते. त्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते
आपण काय शिकलो.
सजीवांना अन्नाची गरज असते.
अन्नामुळे काम करण्याची शक्ती मिळते, शरीराची वाढ होते, शरीराची होणारी झीज भरून निघते .
प्राणी निसर्गात तयार होणारे आयते अन्न शोधून खातात.
वेगवेगळ्या सजीवांचे अन्न वेगवेगळे असते. काही प्राणी मांस खातात, तर काही प्राणी गवत आणि पाला खातात. काही प्राणी इतरांचे रक्त शोषतात, तर काही प्राणी किडे खातात. काही कीटक वनस्पर्तीची पाने कुरतडून खातात.
वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात.
हे नेहमी लक्षात ठेवा
वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नावर संपूर्ण सजीवसृष्टी अवलंबून आहे.
Answer:
mark my answer as brainlist pls
Explanation:
हालचाल करू न शकणार्या बहुपेशीय सजीव वनस्पतींमध्ये झाडे, झुडपे, वेली, शेवाळे व कवक यांचाच समावेश होतो असा सामान्य समज आहे, परंतु तो तितकासा बरोबर नाही. प्रत्यक्षात स्पाँजसारखे प्राणीही हालचाल करू न शकणारे बहुपेशीय सजीव आहेत. या उलट समुद्रात तरंगणारी एकपेशीय शेवाळी ह्यांनाही वनस्पती समजले जाते. याखेरीज आता कवकांचा एक वेगळाच गट बनवला आहे. त्यांना वनस्पती गणले जात नाही.
वनस्पतींमधील विविधता
वनस्पतीची व्याख्या ही 'पुढील दहा गुणवैशिष्ट्ये असलेले उद्भिज सृष्टीतील सजीव' अशी करावी : (१) प्रकाशातील ऊर्जा वापरून स्वतःचे अन्न उत्पादन करण्याची क्षमता म्हणजे (२) अन्न साखर व स्टार्च या रूपात साठवणे (३) कडक पेशीभित्ती (४) पेशींमध्ये केंद्रकाचे अस्तित्व (५) बहुधा बहुपेशीय, परंतु क्वचित एकपेशीयही असू शकतात (६) अमर्याद वाढीची क्षमता (७) सामान्यतः, पण नेहमीच नाही, पकड ठेवण्यासाठी मुळे, आधारासाठी खोड व अन्न तयार करण्यासाठी पाने यांचे अस्तित्व (८) प्राण्यांहून बाह्य उद्दीपनांना अतिशय हळू प्रतिसाद (९) मर्यादित हालचाली (१०) आलटून पालटून बीजाणू आणि पराग व अंडपेशी यांचे उत्पादन.
वनस्पतींत शेवाळी, शैवाल, नेचे, आणि अपुष्प (उदाहरणार्थ सूचिपर्णी वृक्ष) व सपुष्प वनस्पतींचा समावेश होतो. झाडे अनेक प्रकाराची असतात. काही झाडाना फुले असतात. काही झाडाना फुले नसतात.
भारतीय पुराणकालीन पार्श्वभूमीसंपादन करा
पानावरून भाषांतरित
वनस्पती हा मूळचा संस्कृत शब्द (वनस्+पती=वनांचा पती) असून व्यापक स्वरूपात वनस्पती साम्राज्यासाठी सध्या वापरला जात आहे. तरीही, चरक संहितेनुसार, सुश्रुत संहितेनुसार आणि वैशेषिकेनुसार वनस्पती हा शब्द फक्त फळे येणार्या झाडांसाठीच मुख्यतः वापरला जात असे.
ऋग्वेदानुसार वनस्पतींमध्ये वृक्ष, औषधी वृक्ष आणि वेली या तीनच विभागण्या आहेत. यांतील उपविभाग-विशाखा, क्षुप, व्रताती, प्रतानवती इत्यादी आहेत. सर्व प्रकारचे गवत हे 'तृण' विभागात येते. फुले व फळे येणार्या वनस्पती या अनुक्रमे पुष्पवती व फलवती विभागात आल्या आहेत. 'करीर' म्हणून निष्पर्ण वनस्पतींचा पण एक वर्ग त्यांत आहे.
अथर्ववेदात वनस्पतींचे विशाख, मंजिरी, स्तंभिनी, प्रस्तानवती, एकाक्षांग, प्रतानवती, अंशुमति, कांडिनी हे आठ वर्ग तर तैत्तिरीय आणि वाजसेनीय संहितेत त्यांचे १० वर्ग आहेत.
मनुस्मृतीत ८ प्रमुख वर्ग आहेत. चरक संहितेनुसार व सुश्रुत संहितेनुसार वृक्षांची वेगवेगळी विभागणी आहे.