Science, asked by Boom2897, 1 year ago

वनस्पती व प्राणी यांची शरीररचना व कार्ये सारखीच आहेत का?

Answers

Answered by shmshkh1190
1

वनस्पती आणि प्राणी यांची शरीररचना समान नाही, वनस्पती स्थिर असल्या कारणाने बहुतेक ऊती या आधारक ऊती असतात.

ऊती म्हणजे शरीरात विशिष्ट काम करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसमान पेशींचा समूह होय.

वनस्पतींच्या उतींमध्ये मृत पेशी असतात, त्यामुळे त्यांना देखभालीची गरज नसते.  

वनस्पतींमध्ये ठराविक ठिकाणीच विभाजी ऊती असल्यामुळे ठराविक ठिकाणीच त्यांची वाढ होत असते तसे प्राण्यांमध्ये होत नाही, प्राण्यांची एकसमान वाढ होत असते.

वनस्पती एका ठिकाणी उभे राहून अन्न तयार करतात, प्राण्यांना अन्न शोधण्यासाठी हालचाल करावी लागते, त्यासाठी त्यांना ऊर्जेची जास्त आवश्यकता असते.

यासाठी त्यांच्या शरीरात बहुतांश ऊती या जिवंत पेशींपासून बनलेल्या असतात.  

म्हणजेच प्राणी आणि वनस्पतींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती कार्यरत असतात. त्यामुळे त्यांची शरीररचना आणि कार्ये समान नसतात.  

Similar questions