वनशेतीचे पुरस्कर्ता असे कोणाला म्हटले जाते *
Answers
Explanation:
please say in English i can't understand what you say.
Answer:
विनायक दादा पाटील
Explanation:
काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्र राज्याच्या सरकारांमध्ये विविध पद भूषविणारे व एकेकाळी मंत्री असणारे विनायकदादा पाटील यांना वनशेतीचे पुरस्कर्ते किंवा वनशेतीचे जनक असे म्हणतात.
आपले राजकीय कार्यक्रम सांभाळत असताना विनायकदादा पाटील यांनी जंगलांचा विकास करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि राज्य सरकारमध्ये असणाऱ्या त्यांच्या सहभागाच्या जोरावर त्यांनी अनेक वनांचा विकास केला. त्यांचे कार्य पाहून ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांना देखील त्यांची प्रशंसा करण्याचा मोह आवरला गेला नाही ते त्यांना वनाधिपती असे संबोधत असत .
विनायक दादा पाटील यांचे लिखाण देखील खूप प्रसिद्ध आहे. सर्वसामान्यांमध्ये एक साहित्यिक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्यांचे भाषण कौशल्यावर देखील खूप पकड होती .