वनवासी यांच्या बोलीत बोलतात
Answers
Answer:
आदिवासी समाज हा अतिप्राचीन मुळ भारतीय समाज आहे. एकेकाळी भारतीय वनसंपत्तीचा मालक असणारा हा समाज इंग्रजांच्या आर्थिक शोषणामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल बनत गेला. आदिवासी म्हणजे आदिकाळापासुन वास्तव्य असणारा समुह होय. आदिवासी समाज हा निसर्गपूजक आहे. त्यांच्या दैनंदिन जीवनाचे इतर समाजाशी काही देणेघेणे नसते. त्यांचे देव, भाषा आणि चालीरीती अन्य ग्रामीण आणि शहरी लोकांपेक्षा भिन्न असतात. जंगलात राहणारे काही आदिवासी तेथील उत्पादने शहरांत आणून विकतात. भारतीय राज्यघटनेत अशा आदिवासीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये केला आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना नोकरी-व्यवसायात आणि निवडणुकांत उमेदवार म्हणून त्यांच्यासाठी खास जागा ठेवल्या आहेत.भारतात ९ ऑगस्ट हा दरवर्षी आदिवासी दिवस म्हणून साजरा होतो. आदिवासी लोक भारताखेरीज जगातील अन्य देशांतही आहेत. इ.स. १९६२ साली शिलॉंगमध्ये आदिवासी समितीच्या परिषदेने आदिवासीची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे- "एका समान भाषेचा वापर करणाऱ्या, एकाच पूर्वजापासून उत्पत्ती सांगणाऱ्या, एका विशिष्ट भू-प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या तंत्रशास्त्रीय ज्ञानाच्या दृष्टीने मागासलेल्या, अक्षरओळख नसलेल्या व रक्तसंबंधावर आधारित, सामाजिक व राजकीय रीतिरिवाजांचे प्रामाणिक पालन करणाऱ्या एकजिनसी गटाला 'आदिवासी समाज' म्हणताता. [१]
कोरकू बोली : वर्णनात्मक आणि समाजभाषावैज्ञानिक अभ्यास, डॉ. काशीनाथ बऱ्हाटे, देवयानी प्रकाशन , मुंबई , २०१२