India Languages, asked by yashmejar, 7 months ago

वर्गाचे lockdown मध्ये आत्मवृत्त in Marathi essay pls help me ​

Answers

Answered by aj2569055
15

Explanation:

मी मी एकदा शाळेत गेलो होतो. कोरोनामुळे लॉक डाऊन पडलेला होता शाळेत जाऊन मला फार दिवस झाले होते. मी माझ्या वर्गात गेलो अचानक मला एक आवाज आला घाबरलो

पण मी त्याच दुर्लक्ष केले नंतर तो आवाज मला परत आला.

त्यानंतर मी लक्ष केले की तो आवाज मी ज्या वर्गात होतो त्या वर्गाचा होता . वर्ग म्हणाला घाबरू नकोस मी तुला पाहून फारच आनंदित झालो कारण कोरणा झाल्यामुळे शाळा-कॉलेज संपूर्णपणे बंद झाले मला सुद्धा येथे एकटे बसून करमत नव्हते.

तुला आलेले पाहून मला आनंद झाला तुझ्याशी काही गप्पा मारू वाटले म्हणून बोलतोय तर मग ऐक.

मी शांतपणे त्या वर्गाचे आत्मवृत्त ऐकू लागलो. तसा तो वर्ग पुढे म्हणाला मित्रा तुम्ही सर्व जेव्हा शाळेत येतात तेव्हा मला फार आनंद होतो कारण तुम्ही केलेल्या खोट्या तुम्ही केलेला अभ्यास तुम्ही केलेला गोंधळ हे पाहून मला भरभरून आल्यासारखे वाटते. पण या अचानक आलेल्या करणा-या बिमारी मुळे सर्वत्र त्राही त्राही झाली आहे प्रत्येक मानव घाबरत आहे. ह्या कोरणा-या भिमामुळे शाळा सुद्धा तुम्ही नसल्यामुळे मला एकटे झाल्यासारखे वाटते. तुम्ही नसल्यामुळे मला सुद्धा येते रहावेच नाही वाटत पण काय करू मला येथेच राहावे लागते.

मी सुद्धा ईश्वरचरणी प्रार्थना करीन की बिमारी लवकरात लवकर बरी होऊ दे आणखी शाळा लवकरात लवकर चालू होऊ दे. वर्गाची हे म्हणणे पाहून मला सुद्धा मन भरून आले. मी त्याला म्हणलो तुझे म्हणणे सार्थ होऊ दे.

मित्रा मित्रा माझे उत्तर तुला आवडले असेल तर माझ्या उत्तरात ब्रेन लिस्ट मध्ये शामिल कर. धन्यवाद

Answered by MayureshPolke12
1

Answer:

मी आज खूप वर्षांनंतर गावात येत होतो. गावात येताच सगळे बालपण झरझर माझ्या डोळ्यांसमोरून सरकत गेले. मित्रमैत्रिणींसोबत घालवलेले रम्य क्षण माझ्या मनात बागडू लागले. मी जुन्या आठवणीतला एक – एक क्षण गोळा करू लागलो. आमची शाळा जवळ येताच मी थांबलो आणि डोळे भरून शाळा पाहू लागलो. मंद पावलांनी मी शाळेत शिरलो आणि आमच्या जुन्या वर्गात गेलो. मी वर्गात पाउल टाकताच हर्षाची उल्हासाची सळसळ माझ्या कानांना स्पर्शून गेली. मी चमकून पहिले तर मला वर्गात कोणीच दिसले नाही. मी महिन्याची सुट्टी चालू होती. मग आवाज? मी बारकाईने पहिले. सर्व वर्गच हर्षोतफुल चेहऱ्याने माझ्याकडे पाहत होता. होय, हा वर्गाचाच आवाज होता तो काही क्षणातच वर्ग माझ्याशी बोलू लागला.

“काय रे, किती मोठा झालास तू. तुला पाहून खूप आनंद झाला. तुझ्या वेळचे दिवस जसेच्या तसे दिसू लागले बघ! माझ्या निर्मितीनंतर तुम्हीच माझ्यामध्ये बसून शिक्षण घेणारे पहिले विद्यार्थी होतात. माझे नवे-कोरे रूप पाहून तुम्हाला केवढा आनंद झाला होता ! तुम्ही हसत – खिदळत दरवाज्यातून आत आला होतात. मोक्याचीजागा पकडण्यासाठी केवढी धडपड चालली होती तुमची."मला अजूनही आठवतात ते दिवस! तुम्ही सकाळी लवकर येऊन माझी साफ-सफाई करायचात. माझा फळा स्वच्छ पुसून त्यावर सुंदर अक्षरांत वार, सुविचार आणि वर्गातील मुलांचा पट लिहायचात. तुमच्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेने होत असे. दुपारची जेवणाची सुट्टी झाली की तुम्ही मित्र-मैत्रिणी एकत्र बसून डबा खाता खाता गप्पागोष्टी करायचात तुअच्या सगळ्या गप्पा ऐकल्यात बर का मी! आता पण तुम्ही त्या मोठ्या शाळेत सार्वजन मिळून डबा खाता का रे ? तुमच्या सर्वआठवणी मी जपून ठेवल्या आहेत. शाळेत जेव्हा कोणत्या थोर व्यक्तीची जयंती साजरी केली जायची त्या दिवशी तुम्ही माझी सजावट करून माझे रूपच बदलून ताकायाचात. तुमच्या भाषणांतून थोर व्यक्तींचे विचार ऐकून मी धन्य व्हायचो.

खरी मज्जा तर पि.टी. च्या तासाला यायची तुम्ही विविध खेळ खेळायचात कधी मैदानात तर कधीकधी आतमध्ये बसून बैठे खेळ चालायचे तुमचे . मैदानात खेळत असताना वर्गातील कोणालाही दुखापत झाली तरी तुम्ही सार्वजन मिळून त्याची काळजी घ्याचात. त्या वेळी तुमाच्यामधली एकजूट पाहून मी देखील प्रसन्न होऊन जायचो.तुमचे या शाळेतील प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले आणि तुम्ही उच्च शिक्षण घेण्यासाठी दूर शहरातल्या शाळेमध्ये निघून गेलात. आजही आठवतो तो क्षण ज्या दिवशी माझा आणि या शाळेचा तुम्ही निरोप घेतलात. शाळेचा निरोप घेताना तुम्ही खूप रडला होतात. तुम्हाला निरोप देताना माझेही अश्रू अनावर झाले होते. पण हे एक ना एक दिवस होणारच होते. तुमचे पुढचे शिक्षण खूप महत्वाचे होते. तुम्ही गेल्यानंतर सारा परिसर सुन्न वाटत होता. तुमच्या त्या हसण्या-बागडण्याची मला खूप आठवण येत होती.

तुमच्यानंतर अनेक विद्यार्थी येथे आले त्यांनी सुद्धा येथील प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि उच्च शिक्षणासाठी शहरातल्या शाळेमध्ये निघून गेले. कित्येक वर्षे लोटली हळूहळू या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी कमी होऊ लागली. पूर्वी मी भरलेला असायचो आत्ता माझ्या निम्म्या भागात राहतील एवढेच विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेतात. याचे कारण म्हणजे इंग्लिश मिडीअम च्या शाळा. आपल्या मुलाने इंग्रजीतून शिक्षण घ्यावे म्हणून पालकांचा हट्ट असतो. त्यासाठी ते हजारो रुपये सुद्धा खर्च करायला तयार असतात. परंतु मातृभाषेतून शिक्षण घेतले तरच विद्यार्थ्यांना ते चांगले आत्मसात करता येते. इंग्रजीतून शिकून मुलांच्या संकल्पना स्पष्ट होत नाहीत. त्यांना अभ्यासाचे ओझे वाटू लागते आणि ते अभ्यास करायचा कंटाळा करतात. परिणामी परीक्षेत गुण कमी मिळतात. आपल्या मुलाचे कमी गुण पाहून पालक आपल्या मुलांना शिकवणीचे ज्यादा क्लास लावतात. शाळेचा अभ्यासम क्लास चा अभ्यास करता करता मुलं फार थकून जातात त्यांना खेळायला, मौज-मज्जा करायला वेळच मिळत नाही. पालकांना हे कधी कळणार.अरे बाळा, तुला एक विनंती करतो. तू आणि तुझ्या वर्गातले सर्व विद्यार्थी मिळून माझे एक काम करा. विद्यार्थांनी मातृभाषेतून त्यांचे प्राथमिक शिक्षण घेणे किती महत्वाचे आहे. याचा प्रसार करा. मातृभाषेतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा प्रसार करा. मातृभाषेतून शिक्षण घेणे किती महत्वाचे आहे हे विद्यार्थांच्या पालकांना पटवून द्या. आणि विद्यार्थांचे उज्ज्वल भविष्य घडवायला मदत करा. जर अशाच प्रकारे मुलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत राहिली तर एक दिवस ही शाळा बंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग येथील मुलांना दूरवरच्या शाळेत शिक्षण घ्यायला जावे लागेल. मला ही शाळा पूर्वीसारखी मुलांनी भरालेली पहायची आहे. मला पुन्हा जुने दिवस अनुभवायचे आहेत. ही एक माझी इच्छा पूर्ण केलीस तर मी धन्य होईन.

Similar questions