History, asked by GamerJeetyt, 1 month ago

वरील कृती केल्यावर तुला या इतिहासाची साधने या पाठातून काय समजले ते थोडक्यात लिहा.​

Answers

Answered by anilkamble83
15

गावामध्ये असणारे अंबाबाई चे मंदिर हे प्राचीन काळातील उत्तम नमुना आहे. तसेच त्यावर केलेले कोरीव काम हे उत्तम पध्दतीने केलेले आहे.

Answered by sumithi0708
1

Explanation:

गावामध्ये असणारे अंबाबाई चे मंदिर हे प्राचीन काळातील उत्तम नमुना आहे.भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा असे म्हणतात. अगदी शाब्दिक अर्थ न घेता रुपकात पाहिले तर इतर देशांपेक्षा भारत हा देश प्रगत होता असा त्याचा अर्थ सहज निघावा. कुठलाही देश प्रगत होण्यासाठी तेथे राहणारा समाज इतर चांगले विचार अंगिकारणारा असावा लागतो. आपली भारतीय वैदिक संस्कृती प्राचीन संस्कृतींपैकी एक प्रगत संस्कृती मानली गेली आहे. कुठल्याही संस्कॄतीची वाढ ही परिवर्तन झाल्याशिवाय होत नाही, तसेच ही संस्कृतीही त्याला अपवाद नसावी.

रानटी समाज जाऊन प्रगत समजाव्यवस्था तयार व्हायला काही हजार शतके लागली असण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही, पण आपला इतिहास जेवढा जुना आहे तेवढा आज तरी माहित असलेल्या जगात तेवढा जुना इतिहास आपल्या संस्कृतीशिवाय आणखी एक दोन संकृतींचाच आहे. मुळात संस्कृती म्हणजे काय?

संस्कृती : माणूस व्यक्तिशः व समुदायशः जी जीवनपद्धती निर्माण करुन अंगिकारतो, आणि स्वतःवर व बाह्य विश्वावर (जनसमुदाय, निसर्ग ) संस्कार करुन जे अविष्कार निर्माण करतो ते करण्याची पद्धत व तो अविष्कार म्हणजेच त्या समुदायाची संस्कृती होय. थोडक्यात निसर्गावर विजय मिळविन्याचा क्रम म्हणजे संस्कृती. आधिभौतिक व आध्यात्मिक असे संस्कृतीचे दोन भाग आहेत. साधारण आपण असे म्हणू शकतो की ज्या क्रियेने बाह्य विश्वावर बदल घडून येतो ती भौतिक संस्कृती व ज्याने माणसात, त्याचा अंतर्मनावर संस्कार / बदल घडून येतो ती आध्यात्मिक संस्कृती.

माणूस शहाणा झाल्यापासून तो निसर्गाला जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, निसर्गावर विजय मिळविण्यास तो प्रगतिशील आहे. निसर्गाच्या जडणघडणीला कोण जबाबदार आहे? देव नावाची गोष्ट असावी काय? असल्या्स तिचे ऊद्दीष्ट काय? हे प्रश्न माणसाला तो शहाणा झाल्यापासून पडत आहेत. माणसाचा भौतिक गरजा भागल्या की त्याला वेध लागतात, ह्या विश्वाचे रहस्य जाणून घेण्याचे, तो मग ह्या विश्वकर्त्याच्या शोधास निघतो व त्यातून त्याला कळेल ते तत्वज्ञान निर्माण व्हायला सुरू होते आणी हिच आध्यात्मिक प्रगती होण्याची नांदी होय. संस्कृतीच्या आध्यात्मिक भागात धर्म, निती, कायदा, कला, साहित्य, मानवी सदगुण आणि शिष्टाचार ह्यांचा अतंर्भाव होतो.

ह्या जडणघडणीत मानवाने विवाहसंस्था, आर्थिक संस्था, सामाजिक जीवन इ. नियम निर्माण केले. माणसामाणसामधील संबंध, एका समुहाचे दुसर्‍या समुहाशी संबंध हे प्रस्थापित झाले. प्रत्येक संस्कृतीत परिवर्तन निर्माण होत असते, त्यास अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात, जसे युद्धकाल, शांतीकाल,जेते व जीत ह्यांची एकमेकांशी वागणूक इ इ. शिवाय कोणत्याही संस्कृतीच्या प्रगतीच्या कालखंडात जे काही असते त्याचे मूल्य त्या कालखंडापुरते मर्यादित असते. असायला पाहिजे. युग बदलले की मुल्ये बदलतात. म्हणजे संस्कृतीची जडणघडण ही कायम होत असते. एकदा चांगली असलेली संस्कृती एखाद्या रानटी समुहा बरोबरीच्या युद्धात जर हारली तर त्यात होणारे बदल हे त्या संस्कृतीला त्याकाळाच्या मागे नेणारे ठरतात तर प्रगत समुहाबरोबर युद्धात हारली तर पुढे नेणारे ठरतात.

भारताची संस्कृती म्हणजे काय? ती ह्या जडणघडणीतून मुक्त असेल काय? उत्तर साहजिकच नाही असे येते. ज्ञात कालापासून ते आजपर्यंत आपली संस्कृती बदलत गेली आहे, कारण मुल्ये ही त्या युगापुरती असतात हे आपण आधीच मांडले आहे, तसाच परकीय आक्रमणाचा देखील आपल्या संस्कृतीवर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.

वैदिक कालखंड जर शून्य असे पकडले तर त्यानंतर जैन धर्म स्थापना, बौद्ध धर्म स्थापना हे वैचारिक बदल तर शक, हुण, यवन आणि म्लेच्छ ही आक्रमणे आपल्या संस्कृतीने पचविली आहेत. त्यातिल पहिले दोन बद्ल हे वैचारिक होत, मानसिक उन्नती साठी झालेले हे बदल आहेत, ही प्रगती आध्यात्मिक तत्वज्ञान मांडणारी व संस्कृतीच्या आध्यात्मिक बाजूला उन्नत करणारी होती तर शक, हुण, यवन आणि म्लेच्छ ही आक्रमने तत्कालिन भारतीय संस्कृतीपेक्षा हीन दर्जाच्या संस्कृती होत्या, रानटी अवस्थेतून त्या बाहेर पडून त्यांनी भौतिक प्रगतीची द्वारे खुली केली होती. भौतिक प्रगती पूर्ण झाल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती सुरु होणे ही गरजेच्या तत्वात तेवढे चपखल बसत नाही, त्यामुळे ह्या हीन संस्कृतीचा संकर इ स पूर्व कालात व्हायला सुरु झाला होता.

Similar questions