Hindi, asked by veersuvarne, 5 months ago

वर्षीक स्नेहसंमेलनाचे बातमी लेखन करा ​

Answers

Answered by Pratisthadubey
4

Answer:

वसईतील नायगाव जूचंद्र येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. 'महाराष्ट्राची संस्कृती' या विषयावरील कार्यक्रम सादर झाले तसेच गुणीजन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. जूचंद्र येथे ५८ वर्षांपासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ज्ञानदानाचे कार्य करीत असून या शाळेतून शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्चपदावर आहेत. सध्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून गावाचे व वसईचे नाव उज्ज्वल करावे, असे शाळेच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी यावेळी सांगितले.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनास शाळेचे दोन हजार विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. लोकनृत्य, कोळी नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. कोकण मराठी साहित्य परिषद विरार शाखेचे अध्यक्ष उमाकांत वाघ हे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ तळपाडे यांनी शाळेची प्रगती तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेले विशेष प्राविण्य याची माहिती दिली.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या कबड्डी संघाने सीएम चषक स्पर्धेत व वसई तालुका कला क्रीडा महोत्सवातही दुसरा क्रमांक, माणिकपूर कला क्रीडा महोत्सवात बक्षीस मिळवले म्हणून या कबड्डी संघाचा सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा शालेय विद्यार्थ्यांनी सांभाळली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका मयुरी गावडे यांनी केले. स्थानिक शाळा समितीचे उपाध्यक्ष विवेकानंद पाटील, चंडिका देवी न्यासाचे अध्यक्ष हरिहर पाटील, दयानंद गावडे, बन्सीलाल भोईर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक योगेंद्र म्हात्रे यांना 'रयत गुणवंत पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. कुणाल वालवकर या विद्यार्थ्याने परीक्षेत शिष्यवृत्ती मिळविल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यालयातील शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Answered by aryanraj08427
3

Answer:

654तयज्ञतटीय क्षेत्र के कारण भी हो सकता हूँ तो आप भी है और उसके साथ शराब पीने वाले इस दौरान एक ही है और इस पर यह सब लोग अपनी ओर ध्यान नहीं कर सकते है और एक ही में ही में ही एक और इस पर एक और फिर एक ही है और एक दिन के बाद से एक दूसरे की गई तो क्या एंटीबायोटिक दवाओं की तरह ही यह एक ही नहीं हो सकता हूं लेकिन एक दूसरे की तरह के साथ ही है तो क्या एंटीबायोटिक दवाओं के बाद से एक दूसरे की तरह के साथ ही है और फिर क्या एंटीबायोटिक दवाओं का भी एक दूसरे की गई और इस पर ही नहीं हो गई हैं तो क्या आपको यह तो उसे अपनी ही है और उसके बाद भी हो जाता तो नहीं था लेकिन अब भी नहीं है जो कुछ समय से ही नहीं कर दी जाती थीं जो कुछ समय से भी नहीं हो सकता हूँ की एक दूसरे को लेकर एक ही एक साथ एक

Similar questions