India Languages, asked by cbjagdale52, 7 months ago


• वर्षाऋतूतील पाणी निष्फळ वाहून जाऊ नये म्हणून माणसाने काय काय करायला हवे, याबाबत तुमचे विचार लिहा. उत्तर​

Answers

Answered by amitcchavan1993
7

Explanation:

पावसाच्या पाण्याचे संधारण

9 वर्षांपूर्वी

पाणी तारक आहे, पाणी विध्वंसकही आहे. पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जोपर्यंत आपण पाण्याच्या नैसर्गिक समतोलामध्ये ढवळाढवळ करीत नाही, तोपर्यंत पाणी अतिशय विवेकी आहे. प्राचीन संस्कृती, जसे सिंधु-मोहेंजोदडो संस्कृती असो की काही शे-दीडशे वर्षांपूर्वीचे संतवाङ्मय असो, प्रत्येक ठिकाणी जलसंस्कृतीचे एक अढळ अस्तित्व दिसते. आता काही सर्वांना माहीत असणा-या सत्याचा थोडा परामर्श घेणे अनुचित ठरणार नाही. आपल्या शरीराचा ६० टक्के भाग, मेंदूचा साधारण ७० टक्के भाग आणि रक्ताचा सुमारे ८० टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. संपूर्ण पृथ्वीतलावर एकूण उपलब्ध पाण्यापैकी साधारणत: फक्त ३ टक्के पाणी गोड पाणी असून, उरलेले ९७ टक्के पिण्यायोग्य नाही. त्या ३ टक्के पाण्यापैकी साधारण ७० टक्के पाणी गोठलेल्या स्वरूपात असून, फक्त उरलेले ०.३ टक्के पाणी पिण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहे. या पाण्याचा स्रोत, नदी, झरे, भूजल आणि सर्वांत जास्त पावसाचे पाणी आहे. साधारणत: जोपर्यंत आपण पावसाचे पाणी प्रदूषित करत नाही तोपर्यंत पावसाचे पाणी अतिशय शुद्ध स्वरूपात उपलब्ध असते.

पाणीप्रश्न निर्माण होण्यामध्ये आपलाही खारीचा वाटा आहेच. पण तो सोडवण्यासाठीही आपण खारीचा वाटा कसा उचलू शकतो, हे समजून घेणे उपयुक्त ठरेल. कमी-अधिक प्रमाणात पाऊस सर्वत्र पडतो. पण हा सर्वत्र पडणारा पाऊस जास्तकरून वायाच जातो. याचे एक वैचित्र्यपूर्ण उदाहरण म्हणजे, जगातील सर्वात जास्त पाऊस असणा-या चेरापुंजीला (वार्षिक ११ मी.पेक्षा जास्त) ब-याच वेळा पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तेथील नागरिकांना पाण्यासाठी अनेक तासांची पायपीट करावी लागते. कारण इतका प्रचंड पाऊस पडूनसुद्धा तेथे पावसाच्या पाण्याच्या संधारणाची आणि एकंदर पाण्याच्या नियोजनाची कोणतीही योजना प्रभावीपणे राबवली गेली नाही. हे उदाहरण प्रातिनिधिक स्वरूपाचे ठरावे. अशीच परिस्थिती आज भारतात, विशेषकरून निसर्गाचा वरदहस्त ठरलेल्या महाराष्ट्रात आहे आणि म्हणून उपलब्ध पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि संधारण हा एकूणच समस्याचक्रातील कळीचा मुद्दा आहे. शास्त्रीयदृष्ट्या पावसाच्या पाण्याचे संधारण या संज्ञेमध्ये पावसाचे पाणी गोळा करणे, साठवणे, पावसाचे पाणी शुद्ध करून त्याच्या साहाय्याने जमिनीखालील पाण्याच्या साठ्याची पातळी वाढवणे, पावसाच्या पाण्याच्या जमिनीवरील

Answered by preetykumar6666
1

ठिकठिकाणी पावसाचे पाणी आपल्या लॉनमध्ये वेळोवेळी वायुवीजन करुन भिजवून घ्या.

आपण केवळ पाणीच वाचवू शकत नाही तर आपल्या लॉनला पाणी देण्यासाठी आपण कमी प्रयत्न देखील कराल.

पावसाचे पाणी हे जीवन देणारे साधन आहे आणि त्याशिवाय पृथ्वीवर कोणतेही जीवन मिळणार नाही. आम्हाला पिण्यासाठी पाणी देणे हा त्याचा प्राथमिक हेतू आहे.

मुसळधार पावसाच्या दरम्यान, पाऊस जमिनीत नद्या व तलावांचा किंवा भूजल म्हणून ओळखला जाणारा भाग बनतो

Hope it helped...

Similar questions