वर्षा सहल, वनविहारातील मौज मराठी निबंध, भाषण, लेख –...
Answers
Answer:
पावसाळ्यात निसर्गाचे रूप बदलून जाते.वातावरण अगदी प्रफुल्लित होऊन जातो.असे वाटते जणू सगळीकडे हिरवी चादर पसरली आहे.
अशा वेळी वाटते की कुठळ्यातरी राणात,धबधबा किंवा समुद्रकिनारी सहलीसाठी जावे.असाच विचार करून गेल्या वर्षी मी माझ्या भावंडाबरोबर आत्याच्या गावी असलेल्या राणात गेलेली.
दुपारी जेवणानंतर,आम्ही सगळे राणात जायला निघालो.तिथे असलेली मोठमोठी झाडे,शांतता,हिरवळ आणि थंड वातावरणाची मजाच निराळी होती.वेगवेगळ्या पक्ष्यांची आवाजं ऐकू येत होती.जसजसे आम्ही राणाच्या आत जात होतो,तसे ते राण घनदाट होत चाललेले.थोडं आत गेल्यावर आम्हाला एक तलाव दिसले.तिथे आम्ही थोडी विश्रांती घेतली आणि घरातून आणलेले खाऊ खाल्ले.मग आम्ही त्या पाण्यात उड्या मारल्या आणि पोहायला लागलो.पोहत असताना मी सगळे काही विसरून गेलेली आणि फक्त त्या वातावरणाचा आस्वाद घेत होती. तेव्हाच धो धो पाऊस पडायला लागला.पावसाने आमच्या आनंदात भर घातली.
बघता बघता अंधार होऊ लागला आणि आम्ही घरी यायची तयारी करू लागलो.वेळ कसे निघून गेले काही कळालेच नाही आणि माझी ही मजेदार सहल संपून गेली.
Explanation: