वर्तमान पत्रात कोणकोणत्या प्रकारचे वृत्त छापले जातात
Answers
jahirat lekhan , lekh , and more
उत्तर :
★ प्रस्तावना :
वर्तमानपत्र - समाजात सर्व स्तरांमध्ये काय घडले आहे याची सविस्तर माहिती देणारे पत्र म्हणजे वर्तमानपत्र. वर्तमान पत्र सध्याच्या युगात अत्यंत गरजेचे आणि महत्वपूर्ण घटकांपैकी एक मानले जाते. सध्याची लोकप्रिय वर्तमानपत्र - महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत आणि सामना इत्यादी आहेत.
• वर्तमानपत्रांमध्ये सर्व घडामोडी बद्दल माहिती दिली जाते हे तर जगजाहीर आहे.
• वर्तमानपत्रांमध्ये सर्व स्तरातील लहान-मोठ्या घडामोडींबद्दल, झालेल्या घटना तसेच भविष्यातील काही कार्यक्रमांची माहिती वर्तमानपत्रांमध्ये दिली जाते.
• राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी,राजकीय घडामोडी, आजूबाजूच्या परिसरातील घडलेल्या घटना इत्यादी गोष्टी वर्तमानपत्रात असतात.
• याव्यतिरिक्त साहित्य कला क्रीडा संस्कृती घडामोडी चित्रपट (बॉलीवुड) इत्यादी मनोरंजनात्मक गोष्टी वर्तमानपत्रात छापल्या जातात.
• आरोग्यविषयक माहिती देणारे लेख अथवा पुरवणी, वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी इच्छुक पाककृती तसेच शब्दकोडी इत्यादी गोष्टी वृत्तपत्रात छापल्या जातात.